मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|स्त्रीशिक्षा| बायकांनीं म्हणावयाचें गीत स्त्रीशिक्षा प्रकरण १ लें प्रकरण २ रें प्रकरण ३ रें बायकांनीं म्हणावयाचें गीत कामशमन प्रबोध सोवळें सौभाग्यसुंदरी पद सासुरवास पद स्त्रीशिक्षा - बायकांनीं म्हणावयाचें गीत श्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे. Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वतीस्त्री बायकांनीं म्हणावयाचें गीत Translation - भाषांतर ( चाल - रामाची सीता फलपुष्प )प्रश्न :- अग तूं अससी कुणाचि कोण गे बोल जासि कुठें अबले । इथं आलिस कोठुनि भले ॥ मायबाप भादलें कोण तुझा पति आपलें ॥ जात गोत तुवां जाणिलें असलें तरी तें बोले ॥ तुवां काय कृत्य योजिलें ॥ आजपावत काय काय केलें ॥ तुज असें पुसिलें ॥ उत्तरsदें हें चांगलें ॥ नातरी पुढें चाले दत्तदास येथें बैसलें ॥( चाल - माझे हातीची मुद्रिका )उपदेश :- तुझें हित मीग बोलें ऐक । जेणें पावसि इहपर सुख । सत्यसत्यचि घेग भाक । न करीं बाहेर ठाकठीक ॥१॥ रूप लावण्य सौंदर्य । असतां आंगि माधुर्य । देखें जातां नभिंहि सूर्य । होईल तो गतिवीर्य ॥२॥ वृंदा निजधर्माहुनि मुकली । अहल्या साध्वी ही शिला झाली । लंकाधीशें सीता नेली ॥ ब्राह्मी जनकें पळविली ॥३॥ तेव्हां बाहेर तूं होई । भूतराहीं अंतरीं ॥ साधनयुता तोषवि धर्में तुं निजकांत ॥ तेणें तारील तुज दत्त ॥४॥पदबाई सांभाळी आपुला हरी ॥ बाई सत्पदरज माखि आतां ॥धृ०॥ बाळपणी त्वां उपयम केला । परी शास्त्रा न तो मानला ॥ तरी त्यजीं महामोहभर्त्याला ॥बाई०॥१॥ कंठी असुरभाव तंतु हा धरिला तो अशिवचि पहा टांकी तोडुनि न विचारी ॥अहा बा०॥२॥ त्रिगुणात्मक गांठ पल्लविं कुणि बांधिलि सोडि ती हवी जरी पूर्णसुखाची पैरवी ॥बाई०॥३॥ आतां प्रवृत्ती कुंकुम फांस । धरी निवृत्ती तीलकाचि आस । लाधे तरीच तुज मुक्तीरपासा । परपुरुष नवरा करीं । सुमन रोजीं रति घे बरी ॥ मग उन्मनी झोंप घे बुरी ॥बा०॥४॥ आपणा तूं म्हणवि न रजस्वला । अथवा तूं म्हणविग पांसुला । परी होसि प्रिय न हरिला ॥बाई०॥५॥साध्वीधर्म पद( चाल - पार्वती पूसे महादेवासी )आतां करुनि एकाग्रता परिसा साध्वी धर्मा । एका भावें तो आचरितां तुम्हां देईल शर्मा । नर्मा जोडुनि कर्मा उलंडुनि स्वरुपीं रहाल डसुनि ॥ ऐके हो साजणी ॥धृ०॥१॥ दो नवर्या जी भजे नारी ती ह्या लोकीं असती । इह लोकीं ती घेई अकीर्ति मेल्यावर दुर्गति । जे जे पहाती ते ते म्हणती छि थु मरो ही असती ॥ऐका०॥२॥ मरतां असतील बांधुनि नेती यमदूत देउनि मारा । मारा भजलि म्हणुनि न थारा कोण न देती पितरां । घेउनि संगे पूर्वाsपरो नरकीं पडे अवधारा ॥ऐका०॥३॥ साधुगुरूची हो तूं कन्या मग तूं होसिल साध्वी । मृदू मनाची सिंधुदयेची होउनि वाणी माध्वी । बोल बाई मोल कांहीं तुझे मग नोहें साध्वी ॥ऐका०॥४॥ संसार सासुरा तुज नेदी थारा आतां वळ माघारा । सद्विचार माहेरघरा भीमभाड सोडुनि परा । पुरुषासंगे धिंगडा घाली त्याहुनि नाणी मनि दुसरा ॥ऐका०॥५॥ काया वाचा मनें करुनि परपुरुषा तूं भोगि । आठ प्रकारें संशय सोडुनि होशिल मग तूं वेगीं । धन्य जाण मान्य बाई जेवीं या जगीं योगी ॥ऐका०॥६॥ मायावरण लुगडीं फेडीं त्रिगुणवेणी सोडी । पापपुण्य सूत्र तोडी घे चवघांत उडी । कांतपदाची गोडी न दवडी आवडी आन बाई खंडी ॥ऐका०॥७॥ परावरतु देखसी जरी तरी हृदयग्रंथी तुटती । तेव्हांच जे माये सकळहि संशयघट फुटती । ऐशा धर्में लपतिल कर्में दत्तोsप्यभितस्ते ह्मटति ॥ऐका०॥८॥ N/A References : N/A Last Updated : May 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP