स्त्रीशिक्षा - सौभाग्यसुंदरी पद

श्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.


( चाल - उद्धवा शांत० )

सौभाग्य सुंदरी गौरी । दौर्भाग्य माझें वारि ॥धृ०॥
जसि शंकर तुजवर प्रीती । ठेवितो संतत चित्तीं ॥
पती मजवरि प्रीती । तसि ठेवो संतत सुभती
॥चाल॥
सौभाग्य सुंदरी गौरी । गिरिधर शंकर नारी ।
परिहरीं दु:खें सारी । मज धरी स्वकरीं गौरी ॥१॥
मम भर्ता वल्लभ होयी । ऐसा तूं मज वर देई ।
सौभाग्य अक्षय देईं । रूपही उत्तम देईं
॥चाल॥ यश देईं भाग्यहि देईं ॥
पुत्रपौत्र उत्तम देईं । धनधान्य अक्षय देईं । सर्वकाम दे ईश्वरी ॥२॥
वदली अरुंधती ऐसी । ख्यात्याख्याभृगुपत्नीसी ॥
मग ख्याती प्रार्थी तीसी । फळ आलें यास्तव ऐसी
॥चाल॥ भाव ठेवुनि निजमानसी । जी नारी प्रार्थींतीसी ।
सौभाग्य सुंदरी खुशी । होईल हे मनि निर्धारी ॥३॥

प्रार्थनाश्लोक

सौभाग्यसुंदरीं वंदे गौरीं गिरिशवल्लभाम् ॥
सौभाग्यमक्षयं देहि भर्तुर्वर्ल्लभतां मम ॥१॥
रूपं देहि यशो देहि भगं भगवति देहि मे ॥
पुत्रान् देहि धनं देहि सर्वान्कामांश्च देहि मे ॥२॥


N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP