स्त्रीशिक्षा - सोवळें
श्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.
( चाल - उद्धवा शांतवन० )
पडे सूत्रावरी जरी चरण । तरी तुज ये ओवळें पण । मग न्हासी भडाभड पण ।
तुज असतां सोंवळेंपण । जरी विरुद्ध बोले कोण । लागलाच तुज ये शीण ।
चडफडसी अग हे कोण । सोंवळें मानि पूर्ण ॥चाल॥ वासना हे चांभारीण ।
आशा तृष्णा म्हारीण जाण । ममता हे पाहे डोंबीण । रजकिण हे ऐशी अहंता ॥असे०॥१॥
एकभुक्त नक्त करिशी । हरिवासर एकादशी । हरिष्यान्नें चातुर्मास खाशि ।
सेविसि नित्य तुळसी । देह शोषुनि निर्मळ होसी । ब्राह्मणा वाण देसी ।
मनु जपासी तीर्थें न्हासी । परि शुद्धि नसे तुजपाशीं
॥चाल॥
कामक्रोधा धेंडा शिव होशी । दंभ लोभ मांगमानसी । मदमत्सर ह्मारां धरिसी ।
ह्या संगें शुचि कशि होसी ॥असे०॥२॥
कांती पाहुनि खवळे ।
काय करी भरजरी सोंवळें । मन विषयां पाहुनि पळे । काय करितां आचार बळें ।
अहंकार गौरविं उसळे । कशि येति हातीं फळें । ईषणीच चित्त वळे ।
स्वच्छता कशि मग मिळे ॥चाल॥ देह तापे संतत पोळे ।
शिण येतां जिव खंवदळे । नसतां सुख मुख वाळे । मग ढले जनी मृती कैसी ॥३॥
बाई अससी अशी तूं द्वाड । हे सांड वाईट खोड । न करी तूं अशी बडबड ।
निगमाचि धरे वरी भीड । बोलाचि मनि नाणी तीड । स्वहिताची तुज असो चाड ।
आतां ममता अहंता सोड । सदसद्वस्तु नाड ॥चाल॥ कामादिक अरि करीं आड ।
आतां सत्संगती सती जोड । हरी चरणीं धरी आवड । मग तूं सोंवळी होसी ॥४॥
अत्यंत मळकट देह । पापपुण्याचें एक गेह । अस्थिमांसरुधिरसमूह ।
कफपित्तवातव्यूह । तूं न धरी यावरी मोह । येथें घे तूं ऐसा ऊह ।
अत्यंत निर्मळ देह । धरसी चित्सुख संदोह ॥चाल॥ महदंतरमनयोराह ।
वेदस्तज्ज्ञानेनेह । शोध्यं तेन शुचित्स्वं ह । दत्ताला प्रियतम होसी ॥५॥
असें कैसें सोवळें करिसी दुजा शिवतां ओंवळी होसी० ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 23, 2016
TOP