स्त्रीशिक्षा - सासुरवास पद

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


( चाल - अहारे कृष्णा० )

अहा मायबापा लोटुनि देशी । मज दिन - निशीं सासुरवाशीं ॥धृ०॥
चिंतोबा मामाजी फजिती माजी । करिती प्रवृत्ती सासू मज भाजी ॥अहा०॥१॥
तृष्णा हे नणदूली लावालावी भली करी । लावी कली आपण हो भली ॥अहा०॥२॥
चावट दीर हे काम क्रोध लोभ ॥ शांतीशेस्जे घरईं जातां देती क्षोभ ॥अहा०॥३॥
वन्सानी माझे पुरविली पाठ ॥ रति आकाबाई पाडिती फूट ॥अहा०॥४॥
किती करूं धंदा किती काढूं चेंदा ॥ माहेरीं एकदां ने मज गोविंदा ॥अहा०॥५॥
समाधान भोजन नच एक दीन ॥ न मिळे येथें दीन झालें निशिदीन ॥अहा०॥६॥
उपकार कोणा न येचि करुणा ॥ अहंकार टोणा पती मारी तरुणा ॥अहा०॥७॥
बाबा आतां होतें मी नि:संग ॥ पर पुरुषाचा करुनियां संग ॥अहा०॥८॥

( चाल - सिंदूर भरिला भांगीं कुंकु० )

दत्ता ये लवकरी ॥ वाट पाहें मंदिरीं ॥ धांव घे झडकरी ॥ मज धरिं पदरीं ॥
गांजिलें संसारीं । सुख नसे तिळभरी । अपराध बहु जरी । करिं परि अंतरीं ॥
न धरीं नरहरी । मजवरि कृपा करें । प्रवृत्ति सासु मारी । कसि वांचुं घाबरी ।
तृष्णा ही वन्त्सां भारी । जाचिते परोपरी । काम भावोजि हरी । गांजि निरंतरी ॥
मन मामजि दूरी । फिरवि क्षणभरी । विसांवा नेदि भारी । भ्यालें मीं अंतरीं ॥
अशि कशी या घरीं । काळ कंठु यापरी ॥ बोलाहो ह्या उपरी । राहति शरीरीं ।
प्राण केवि सुंदरी । मी विटें यापरी ॥ समजुनि मनिं हरी । जाच हा त्वरा करीं ।
भेट देई नरहरी । गांठ पडे तुझि जरी ॥ मग त्या अवसरी । हीं भिवुनी सारीं ।
माकडें कुठें तरी । लपतिल निर्धारी । मग तुझ्या जिवावरी । सुखि मि निरंतरी ॥१॥

( चाल - ऐका शोणितापूरीं बाणासूर० )

जया रूपीं ठकली वेदवाणी ॥ तया दत्ता जोडितों दोन पाणी ॥धृ०॥
व्यर्थ माझे वाणीला दिधला शीण । जया रूपां नेणती वाणी निपुण ॥
प्रजाकाम धन योगें या धरी कोण ॥ प्राणा जिंकुनि ठकले परि ज्या नेणें कोणी ॥१॥
आत्यंतिक सुखसच्चिद्रूप अभेद ॥ हा वेदांत सिद्धांत निर्विवाद ॥
हेचि स्मरतां भजतों सोडुनि खेद ॥ बुद्धिग्राह्या अतींद्रिया ऐक्यपणीं ॥२॥
तो हा दत्त मजहूनी दूर नसे ॥ सर्वांतरीं साक्षित्वें एकचि विलसे ॥
त्याहुनि कधिंही मीही भिन्न नसें ॥ ऐसें वेदें ठरतां कैंची माय भेणी ॥३॥

( चाल - आम्हां घरीं न पाहुणे )
( समयाळु किति आला ग तुझा पती )

जरी यावे पाहुणे घरीं । प्रेमसडामार्जन करीं । मग येती नरहरी ॥१॥
आण वेगें आवडी जळ । भक्तिभूषा सुविमळ । आणि सुमनाची हो माळ ॥२॥
अहंकार धूपजाळ । उजळिं सोहं दीपमाळ । खाद्य सर्वस्व रसाळ ॥३॥
नवविध भक्ति नवू । पक्वान्नें करी मवू । दत्त हर्षे देखुनि बहू ॥४॥
सावध तूं आतां दळू । आरंभींग हळू हळू । गाई दत्ता जो दयाळू ॥५॥
श्रद्धाभक्ती जोदुनि पेडें । वैराग्य खुंटा दृढें । धरि साधन बळें ओढे ॥६॥
दळूंग बाई दलू । संचित्क्रियमाण दळूं । प्रारब्ध शेष ते चाळूं ॥७॥
दळूंग बाई दळू । जन्म मरण हे दळूं । स्वाधिष्ठानीं तत्त्वें गाळूं ॥८॥
दळूग बाई दळूं । उपाधिं सकळहि दळू । तीन्हीही तुण ते गाळूं ॥९॥
दळू ग बाई दळूं । नि:शेष सकळहि दळूं । जेणें येथें पुन्हां न दळू ॥१०॥
कर्म भोगा दळतां हाता । खेदफोड उमटे मोठा । विवेकें जिरवी खोटा ॥११॥
ऐसे गातां दळतां दळतां । दत्ता किंव आली मग जीवता । हरुनी दे सायुज्यता ॥१२॥

( चाल - चल सखये पाहुं हरि तो गोकूळी काला झाला खेळता कृष्ण आला )

नर जन्मा येउनि पूर्वी कर्में केली न बरवीं । दणवीली भारें उर्वी ॥१॥
मातापीता इष्टभ्राता उपदेष्टा दाताभर्ता । भयहर्ता चुलता ज्ञाता ॥२॥
सकळांयां द्वेषी निंदी वाग्बाणें हृदयें भेदी । विषयसुखीं सदां आनंदी ॥३॥
कुळाकूळ न विचारी । भक्ष्याभक्ष्य न निर्धारीं । असि विटें मी यापरी ॥४॥
कायीक अणि वाचीक । मानसिक सांसर्गिक । केले हो म्यां बहु पातक ॥५॥  
स्पृष्टास्पृष्ट ज्ञाताज्ञात । भुक्ताभुक्त पीतापीत । करिं पापें मी सतत ॥६॥
सर्वपाप अति पाप । बहुपाप उपपाप । आचरीं मी पापरूप ॥७॥
अणि संकलीकरण करि मलिनीकरण जाण जातिभ्रंशकरण प्रकीर्ण ॥८॥
प्रमादेंहीं घडली कीती । बुद्धिपूर्वक अमित होती । अत्यंताभ्यासें कीती ॥९॥
ऐसिं पापें करिं मी परी । तिलभरी नभि अंतरीं । विषयसुखविरह न करीं ॥१०॥
मग भोगें उथले रोग ॥ देह झाला कृश बेरंग । श्वासें कासें हाले आंग ॥११॥
माझे माझे ज्यां ज्यां म्हणे । टाकिले मज त्याणें त्याणें । यमदूतीं केलें पेणें ॥१२॥
अशतवृश्चिकदंशव्यथा । होयि जेवी तेविं सर्वथा । लिंगदेहा ओढिता व्यथा ॥१३॥
यममार्गीं  जी जाचणि । वतरणी जी दे भेदी । कशी सांगवी ती कोणी ॥१४॥
बहुपाशें बांधुनि नेती । तप्तधूळी पाया जाळिती । रविकिरणें खर पोळीती ॥१५॥
शंकुतुल्य कंटक रुतती । क्षुरधारासम शिळापंथी । पाय फाळूनी टाकिती ॥१६॥
शिलावृष्टी वज्रवृष्टी । ज्वलदंगाराची वृष्टी । पडे तप्तजलवृष्टी ॥१७॥
काकगृघ्र बहु डोचीती । सूचिमुख किडे डसती । अग्निसमा वायु जाळीती ॥१८॥
कोठे खात कोठें गर्त । कोठें पीडे शीत ध्वांत । ऐसा कष्ट यमपंथ ॥१९॥
रक्तपाणी वैतरणी । गर्जताती ऐकुनि प्राणी । हाहाकारें पिटिती धरणी ॥२०॥
द्विजां अंतीं कृष्णगोदान । न देति त्या गरि लावून । दूत नेती जेवीं मीन ॥२१॥
अस्थिमांसरक्तरूपीणी । घोरकाया वैतरणी । तरावी हे कैसी कोणी ॥२२॥
यममार पुढें दारुण । सोसिल तो केविं कोण । दैवयोगें नये मरण ॥२३॥
कर्वतीनें कातरती । तत्पभूमीवरी लोळवीती । कुर्‍हाडानें  बळें तोडीती ॥२४॥
कढईंत घालुनि तळति । रगाड्यांत रगडीती । त्रिशुलानें हृदय भेदीती ॥२५॥
तप्ततैल पिववीती । वृक्षावरी उलटा टांगिती । आतां बोल मार कीती ॥२६॥
चवर्‍याऐंशींलक्ष नरक । त्यामध्यें जें घडे दु:ख । त्याच कोण कसा करि लेख ॥२७॥
ऐसि यातना भोगोनी । पापशेषें नानायोनी । भोगि पराधीनपणीं ॥२८॥
थंडी ऊन पाउसपाणी । वारा वावटळ सोसूनी । घेण्यासाठीं तिर्यग्योनी ॥२९॥
शुभाशुभ सम होतां । पापचिन्हें घेऊनि नरता । लाधली हे मजला आतां ॥३०॥
मातापित्याच्या संयोगें । रक्तवीर्ये कर्मभोगे । उपजली प्राक्तसंगें ॥३१॥
मातृगर्भी मळमूत्रांत । लोळलीं जरापुवीत । जाळी जठराग्नि सतत ॥३२॥
ऐसे जातां मास सात । ज्ञानार्क झाला ऊदीत । मग सर्व झाले स्मृत ॥३३॥
तेव्हां निश्चय केला दत्ता । करि येथुनि मुक्ती आतां । मग सेवीं तुज मी कांता ॥३४॥
मग देवें मुक्ती केली । तेव्हां अकस्मात झाली । अविद्या रात्र भली ॥३५॥
मोहमयी मदिरा प्याली । तुष्ट झाला दत्त शरण्य । दत्तदेव जो वरेण्य ॥३६॥
ज्ञानपहांट आतां झाली । निद्रा कांहीं कडसरली । मग दळूं आरंभली ॥३७॥
जन्ममूळ दळप दळूं । अणि मरण पुढें टाळू । आत्मीं मी ह्या स्वरुपा पाळूं ॥३८॥
अहंकार दळप दळूं । मायावरण पीठ गाळूं । विक्षेप स्वरुपा घोळूं ॥३९॥
उपाधी दळपा दळूं । द्वैत पीठ मग तें तळूं । शुद्ध सत्त्व स्वरुपा पाळूं ॥४०॥
ऐसे दळप बाईग दळूं । नि:शेष सकंळहि दळूं । सर्व ब्रह्म असें सांभाळूं ॥४१॥
असें दळतां अविद्या रात गेलि विज्ञानार्क उदेला । जीवचंद्र दडपला ॥४२॥

( चाल - पांच पोळिया तीन भाकरी० )

श्रुति सासु इशा सासुरा । सच्चिदात्मा तुझा नवरा ।
तूं आलीस या संसारा । स्वानुभवा घरि तुझा घरा । नव न जा अभिमान माहेरा ॥१॥
साजणी उपदेश हा बरा ॥धृ०॥
देहात्मधी परदारा । सोडि झाडी अविचारकेरा । क्षमा सडा दे या घरा ।
भरुन्ठेवि अहिंसा निरा । लेईं देहिं भक्त्यलंकारा ॥साजणी०॥२॥
श्रद्धा जळीं स्नान आचरा । र्‍हीवसना परिधान करा ।
सत्क्रिया रांधप करा । तेंचि वाढा परमेश्वरा । यांत कसोरी नच आचरा ॥साजणी०॥३॥
वैराग्य कुंचा धरा । तुम्ही झाडा इषणा केरा । ज्ञानदिवा उजळा बरा ।
आतां सुमनसे जप ससा । स्वात्मसुख दे मग नवरा ॥४॥

( चाल - मंडपी बैसले नवरीचे भाऊ० )

साजणी परिसें तूं सौख्य हेतू । दृढ राहे धर्म सेतू न घडेग मंतू । धर्म केतू भला हा ॥१॥
आदि सोमा त्वां वरिला । मग गंधर्वाला तिजा अग्नि पति केला । मग मनुष्याला परि तुला न सूख ॥२॥
दागिनेग सुरेख भोजन चोख चोळि लुग्डीं थळीक । धनधान्य लेंक बहुपरि ऊणें सूख ॥३॥
चुकलें याचें मूळ ऐक परपुरुषा देख विद्यमान सुरेख हाचि नाथ एक संनिध नित्य असे ॥४॥
या देहीं विलसे सर्वदा भासे रत्यर्थ देतसे तो रमण तो दीसे । शोधितां कोश पांच ॥५॥
होतां याची भेट साच लाभे सर्व हाच चराचरनिच उंचग अन्य नच याहुनि सत्य जाण ॥६॥
श्रद्धाभक्तिज्ञानपूर्ण नसतां हा रमण न दिसेगिच म्हणोन साधी हे आण दत्तदेवाची तुज ॥७॥

( चाल - जयदेवी अन्नपूर्ण० )

लक्ष दे दत्तचरणीं सुविचार मनिं आणीं ॥ परिसें साजणी उपदेश तुज कोणी ॥१॥
केला कां तूं राणी होवुं पाहसीं झणीं । कशाला फणिवेणी व्यर्थ लुगडीं लेणीं ॥२॥
यमपाश हा मनी तोडिल कि ऊन पाणी चुकविल मार भेंणी बोल आतां रमणी ॥३॥
टिळे उटि जाचणीं शमविति कीं अणिं भुललिस चुडेकंकणी गौरव भरणीं ॥४॥
परतविन दूतां क्षणीं, भुलुं नको तूं झणीं, मायबाप भावभेणी । मुलेंसुना व्याहि वेणी ॥५॥
धणि तुझे नहे कोणी । जाचतिल खाणि पिणि । देहही पडे धरणी । एकलाचि मसणीं ॥‍६॥
उघडे नाघडेपणीं शुभाशुभ करणि लागे मागे तूं पाणी जोडुनि गार्‍हाणीं सांग गे दत्त चरणीं तोचि हरे भावभेणीं ॥७॥

( चाल - पंचमी बुधवारी पुष्य नक्षत्र० )

बायि गायी बघ या पांच त्याची पाहे पांच पांच वासुरें वळखी साच ॥१॥
एकाहून एक गूणी त्या प्रत्येक भिन्न वर्णी ओळखी धरुनी खूणीं ॥२॥
पैलि निळी हं बीजपाळी दुजी धूम्रायं सांभाळी तिसरी रंबीजपाळी ॥३॥
वंबीजा टवळी चौथी पांचवी पिवळी लंवती ह्या पांचा वळखी चित्ति ॥४॥
प्रतिशब्द पहिली करी दुसरे सोंसों उच्चारी भूगूभूगो तिसरी करी ॥५॥
बुलूबुलू चवथी बोले पांचवि कडकडा बोले ह्या शब्दा धरि तूं बोले ॥६॥
वदे पहिली स्पर्श दूजी सर्वां दावी स्वरूप तीजी चवथी दे गोडी गाजी ॥७॥
पंचवी सुवासिक घ्यावि ह्या वळखुनि एकएक पावसी मग तूं सूख ॥८॥
सत्ता दूध काढुनि यांचें जरि तें हृदयीं तुझे साचें दर्शन होय तुज दत्ताचें ॥९॥

स्त्रीशिक्षा समाप्त


N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP