स्त्रीशिक्षा - प्रबोध

श्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.


प्रबोध पहाट बाहेर जहाली उघडीं विवेकलोचना, उठीं उठीं सत्वर बाई सोडिं या मायाशयना,
सरली अविधि निशा आतां गाढतमा उरविना, गुरुप्रसाद अरुणोदय हा सांवर साधनवसना ॥१॥
उठी उठी सत्वरबाई सोडिं या मायाशयना, सृष्टिक्षणापासुनि येवढा काळ गेला तुज कळेना,
येतों मीग काकुळती असमंजसहें पाहावेना, किती ढळवूं उठगे आतां उघडी विचारलोचना ॥धृ०॥
ठाई ठाई स्वानुभवज्योतीं पाजळील्या ब्राह्ममुहुर्ती, द्वैत चुळ भरुनि ओतीं भ्रांती जेणे मग नुरती,
दृश्यभास तारापंक्ती जेथचा तेथचि लपती जीवचंद्राचीहि दिप्ती हळुहळु पाहें लपती ॥२॥
उठी०॥ भेदकांडप कांडुनि बाई जन्ममूळ दळप दळी, सुटलीं मनवासुरें पळतील दूर तीं आकळीं,
इंद्रियगाई निर्गुणवनी सोडूनि दे ह्या वेळीं, मग कामादिक चोरांची पर्वा न ये तुज बाळी ॥३॥
बाई विज्ञानर्कउदेता देहधी धुकें लपति, वैराग्य किरणें पडतां विषय कुमुदें वाळती,
आशा तृष्णादिक आलि त्या मधि आपोआपचि मग मरती, परी मूढ मृगां विषममृगंतृष्णा भ्रमवी ॥४॥
उठी०॥ तेव्हां आतां सोडुनि भ्रांती सावधान चित्त करावें, वासना शेजारीण ईच्या गृहा नच जावें,
तत्त्वज्ञान निजगृहकृत्य स्वानुभवगेही करावें, मग मन भंगुनि तुवां लवकर दत्तमय व्हावें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP