राग बिलावल
( चाल : जय मंगलम् )

जय विठ्ठल, हरि विठ्ठल, जय विठ्ठल ॥धृ॥
हरिनाम सदा राहो माझ्या मुखीं ॥
तेणें होई जीवन आपुलें सफल ॥१॥
तुझें नाम भजनीं जिवा समाधानी ॥
नयनीं येई मग प्रेमाश्रू भरुनी ॥२॥
भावें तुज वंदु देवा दीनबंधु ॥
दासीचें नमन तव चरणीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP