अभंग ७
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - झींझोटी
चाल : झाली ज्याची
श्री विठ्ठल माझा माय बाप बंधु ॥
कृपाळु दयाळु दीनबंधु ॥धृ॥
दर्शन होता आनंदले अती मनी ॥
प्रेमाश्रुनी नयन येतसे भरुनी ॥१॥
पहाता मुखकमल दृष्टी हो स्थिर ॥
हरीमुखावरी दिसे हास्य मधुर ॥२॥
हास्य मुख पहाता आनंद अनीवार ॥
दासी नमीत हरि चरणी वारंवार ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP