अभंग ५
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - झिंझोटी
( चाल : झाली ज्यांची )
ध्यानीं ध्याता श्रीकृष्ण ॥
चिंतनी चिंतीता तो श्रीकृष्ण ॥धृ॥
बसता उठता श्रीकृष्ण ॥
अखंड वदनीं कृष्ण कृष्ण ॥१॥
नयनी पाहता तो शाम कृष्ण ॥
पाऊल टाकता पुढे उभा कृष्ण ॥२॥
अंतरीं बाहेरी आतां एक कृष्ण ॥
रोमरोमीं भरलासे श्रीकृष्ण ॥३॥
कार्यकारण कर्ता तो श्रीकृष्ण ॥
दासीचें दैवत श्री प्रभू कृष्ण ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP