अभंग ८
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - जय जयवंती
सद्गुरू नायके
जिवाचा विषय आता एक नारायण ॥
दुजा विचार नये कैंचा हरिनामाविण ॥धृ॥
विवेक - वैराग्य युक्त राही हे मन ॥
दया शांती चित्ती वसो, सर्वाभूतीं प्रेम ॥१॥
काळ येतसे समीप क्षणोक्षण ॥
वाया न जावा पळ एक नामाविण ॥२॥
रामकृष्ण गोविंद जय हरी विठ्ठल ॥
रात्रंदिन सतत म्हणा हे हरी बोल ॥३॥
नामेच होईल जिवन आपुलें सफल ॥
दासी म्हणे जन्ममरणफेर चुकेल ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP