अभंग ६
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - भैरवी
चाल : चला बाई पांडुरंग
कुलस्वामिनी जगदंबा, तुळजापूरवासिनी ॥
आदी दैवते वंदन, तुजला जगत् -जननी ॥धृ॥
महिषासूरमर्दिनी तूं, त्रिभुवन तारिणी ॥
उदो उदो तव नामाचा, घोष करिती वाणी ॥१॥
आदीशक्ती आदीमाया, आई भवानी ॥
अनंत नामें तुज वानिती, जगत निवासनी ॥२॥
महालक्ष्मी महाकाली, सिंहवाहिनी ॥
अष्टभुजा दुर्गा देवी, हिम नग नंदिनी ॥३॥
देवी शारदा सरस्वती, मयुरासनी ॥
दासीचें नमन तुम्हा, माते भवानी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP