अभंग १
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
॥ मंगलाचरण ॥
अभंग १
राग - भूप
वंदन तुम्हां श्रीपांडुरंगा ॥
अत्यादरें करीते साष्टांग नमना ॥धृ॥
त्रिभुवन - दाता तूं जगन्नाथा ॥
मंगल करतां दु:ख - हरता ॥१॥
अनाथ - नाथा हे जगदीशा ॥
करुणा करा पंढरीशा ॥२॥
पतित - पावना दिना - नाथा ॥
दीन दया - घना पंढरीनाथा ॥३॥
कृपादृष्टी ठेवी मज अनाथा ॥
प्रेमादरें दासी ठेवी चरणीं माथा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP