अध्याय ८७ वा - विशेष श्लोक ६ ते ७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तन्त्रवार्तिककृतः - सर्वथैव हि विज्ञानं संस्कारत्वेन गम्यते । पराङ्गं चात्मविज्ञानादन्यत्रेत्यवधार्यतामिति ॥६॥

कल्पादिसृष्टीपासून येथ । जन्मजन्मान्तरें अध्यस्त । संस्कार जडला आजि पर्यंत । उद्बोधित तो विज्ञान ॥९३५॥

श्लोकार्धसम्मतिः - मोक्षे धीर्ज्ञानमन्यत्र विज्ञानं शिल्पशास्त्रयोः । इत्यमरः ॥७॥

तस्मात शिल्पशास्त्रमय विज्ञान । स्फुरे सर्वत्र संस्कारजन्य । आत्मविज्ञानावांचून । ऐसें वचन वार्तिकींचें ॥३६॥
स्त्रियेसी रजोदर्शन कुच । कीं पुरुषासी श्मश्रु कूर्च । यथावयें निघती साच । तेंवि नडनाच सांस्कारी ॥३७॥
तैसें नोहे ब्रह्मज्ञान । कीं संस्कारें होय उत्पन्न । येथ साधनचतुष्टयसंपन्न । लाहे पूर्ण गुरुकृपया ॥३८॥
तयाच्या दृढीकरणा मुनी । प्रवर्तती श्रवणीं मननीं । भूतळीं भ्रमती तीर्थसदनीं । महंतां लागोनिं आश्रयिती ॥३९॥
तेचि श्रवणमननरीती । कैसी प्रतिपादिली महंतीं । तें परिसिजे सावध श्रोतीं । कुरुवरनृपतिसमसाम्यें ॥९४०॥
मीमांसकीं प्रश्न केला । यथाम्नायें तो खंडिला । यदर्थीं संशय असे उरला । तरी तो बोला विवरूनी ॥४१॥
द्वैत सत्यत्वें जरी असतें । तरी मीमांसकांचें ही मत घडतें । सत्यत्व नाहीं च मुळीं द्वैतातें । मनःकल्पितसें भासतसे ॥४२॥
इत्यादि प्रश्नोत्तरांच्या श्रवणें । महंता पासूनि मनन करणें । तत्वावधारणा कीजे येणें । प्रकारें म्हणोनि वदे श्रुति ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP