मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १ ला| अध्याय १० वा स्कंध १ ला अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध १ ला - अध्याय १० वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १ ला - अध्याय १० वा Translation - भाषांतर ७१राज्यलोभी दुर्योधनादि वधूनि । राज्य केंवी जनीं केले धर्मे ॥१॥ऐसें पुशितां त्या कथीतसे सूत । दावाग्नींत वंश रक्षूनियां ॥२॥उत्तरेचा गर्भ संरक्षूनि, राज्य । अर्पूनि धर्मास तोषे कृष्ण ॥३॥ईश्वराधीन हें विश्व न स्वतंत्र । भीष्म - कृष्णबोध धरुनि ध्यानीं ॥४॥राज्य करी धर्म इंद्रासम लोकीं । त्रिविध तापांची भीति गेली ॥५॥कामवृष्टियोगें धनधान्यपशुवृद्धि । धेनु वनस्पति सफल होती ॥६॥आधि व्याधि तेथें न बाधती कोणा । संतोष जनांना सर्वकाल ॥७॥वासुदेव म्हणे वैरी न धर्मासी । राजनीति त्याची निष्कलंक ॥८॥७२पांडवहितार्थ हस्तिनापुरांत । वसे कांहीं मास कृष्ण ऐसा ॥१॥पुढती द्वारकागमनार्थ सिद्ध । होतांचि मुकुंद सकलां दु:ख ॥२॥धर्मादिक तया प्रेमें आलिंगिती । नकुलादि वंदिती अत्यादरें ॥३॥दर्शनेंहि ज्याच्या होई भवभंग । तयाचा वियोग कैसा साहे ॥४॥परी मंगलार्थ अश्रु आंवरिती । सुभद्रा, द्रौपदी आदि स्त्रिया ॥५॥वासुदेव म्हणे कृष्णासी निरोप । द्यावया समस्त नगर सज्ज ॥६॥७३वणवे न थाट श्रीकृष्णस्वारीचा । जन सर्व धंदा त्यजूनि येती ॥१॥निनादुनि जाई वाद्यनादें नभ । सुशोभित मार्ग फुलूनि जाती ॥२॥मुक्तामालायुक्त छत्र हरीवरी । धरुनियां करीं पार्थ उभा ॥३॥उद्धव, सात्यकि चवर्या ढाळिती । सुमनें वर्षती नारीगण ॥४॥द्वारावरुनि ज्या रथ श्रीहरीचा । जाई, प्राण त्यांचा कासावीस ॥५॥भक्तकार्यास्तव जाहला साकार । आशीर्वाद विप्र तया देती ॥६॥वासुदेव म्हणे स्त्रियांचा संवाद । प्रसंगीं त्या गोड केंवी ऐका ॥७॥७४सखीजनांप्रति बोलली स्त्री एक । कृष्ण गुणातीत आदि अंतीं ॥१॥आधारें जयाच्या माया करी खेळ । प्रेरक ते कालशक्ति त्याची ॥२॥निजांशेची जीव होऊनि जो राहे । योगियांसी पावे दर्शनानें ॥३॥तोचि आम्हीं अद्य पाहिला भाग्यानें । व्यर्थ भक्तीविणें सर्व यत्न ॥४॥वेदगुह्य हाचि राहूनि अलिप्त । अवतरे मत्त होतां राजे ॥५॥अहो भाग्य मोठें मथुरापुरीचें । तेंवी यादवांचें भाग्य थोर ॥६॥धन्य ते द्वारका धन्य कृष्णस्त्रिया । लाभे नित्य जयां सहवास हा ॥७॥सूत म्हणे ऐसें बोलताती स्त्रिया । निरोप यादवा सकल देती ॥८॥वासुदेव म्हणे सांत्वन करुनि । आनंदें निघूनि जाई कृष्ण ॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP