मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ६ वा| अध्याय ७ वा स्कंध ६ वा षष्ठ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध ६ वा - अध्याय ७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ६ वा - अध्याय ७ वा Translation - भाषांतर ३७निवेदिती शुक राया, परीक्षिता । स्वर्गांत एकदां येतां गुरु ॥१॥उत्थापन नाहीं दिधलें इंद्रानें । सोडूनि सभेतें गुरु जाई ॥२॥पश्चात्ताप तदा होई इंद्राप्रति । म्हणे माझी मति भ्रष्ट झाली ॥३॥इंद्रानें गुरुसी मानूं नये ऐसे । कथील जो त्यातें न कळे धर्म ॥४॥शरण मी आतां जाईन गुरुतें । कळतां गुप्तरुपें जाती गुरु ॥५॥इंद्र येतां गुरुभेट नच होतां । करी बहु चिंता देवराज ॥६॥वासुदेव म्हणे दैत्यांसी हें वृत्त । कळतांचि ते सिद्ध युद्धा होती ॥७॥३८दैत्याघातें देव घायाळ होऊनि । प्रार्थिती जाऊनि ब्रह्मदेवा ॥१॥ब्रह्मा म्हणे विप्रअवमान ऐसा । दैत्यही करितां फंसले होते ॥२॥शुक्रांचें रक्षण, मंत्र ज्यांचा गुप्त । माझेंही न त्यांस भय आतां ॥३॥गोब्राह्मण तैं विष्णुकृपा जया । तोचि संकटीं या धीर तुम्हां ॥४॥विश्वरुप त्वष्टापुत्र आत्मज्ञानी । प्रेम जरी मनीं दैत्यांचें त्या ॥५॥शुश्रुषा तयाची करितां कार्यसिद्धी । ब्रह्मावच कथी वासुदेव ॥६॥३९विरंचीवचनें विश्वरुपाप्रति । जाऊनि भेटती देव हर्षे ॥१॥अतिथि पातलों म्हणती तयांतें । पुरवीं इच्छेतें पितरांच्या ॥२॥वेदचि आचार्य ब्रह्मदेव पिता । बांधव देवांचा राव इंद्र ॥३॥माता ते धरणी दयाचि भगिनी । अतिथीसी ज्ञानी म्हणती धर्म ॥४॥अभ्यागतमूर्ति अग्नीचि ते जाणा । भूतमात्रीं गणा आत्मरुप ॥५॥शत्रुपराभवें पीडा त्वत्पित्यासी । यास्तव विनंती तुजसी एक ॥६॥योजितों तुजसी उपाध्याय आम्हीं । सानही या जनीं वंद्य गुणें ॥७॥वासुदेव म्हणे मंत्रज्ञ जो विप्र । सानही तो थोर म्हणती देव ॥८॥४०विश्वरुप बोले होऊनि प्रसन्न । देवांचे वचन ऐकूनियां ॥१॥शिलोंछवृत्तीनें निर्वाह करुनि । राहतसों आम्हीं आनंदानें ॥२॥सोडूनि तो मार्ग ब्रह्मतेजहानि । जेणें तया कर्मी प्रेम नसे ॥३॥निंद्य पौरोहित्य परी तुम्हांस्तव । स्वीकारुनि कार्य करीन मी ॥४॥लोकपाल तुम्हीं मागतां येऊनि । नकार देऊं मी कैसा तरी ॥५॥यास्तव सर्वस्व लावूनि पणातें । करीन देवांचें सकळ कार्य ॥६॥देवहेतु ऐसे पूरवूनि देई । विद्या ती वैष्णवी इंद्राप्रति ॥७॥वासुदेव म्हणे ऐसे उदारात्में । निरपेक्षपणें करिती कार्य ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP