मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ८ वा| अध्याय ३ रा स्कंध ८ वा अष्टम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ८ वा - अध्याय ३ रा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ८ वा - अध्याय ३ रा Translation - भाषांतर १५(गजेंद्रानें जपलेंले स्तोत्र) परीक्षितीलागीं बोलताती शुक । चिंतूनि हरीस स्वस्थ गज ॥१॥पूर्वजन्मार्जित श्रेष्ठ स्तोत्रजप । होऊनि एकाग्र करी प्रेमें ॥२॥जयामाजी जेणें नटला जो विश्व । तया नमस्कार आदिबीजा ॥३॥रचलें खचलें पाही जो हें कदा । तया स्वयंप्रभा नमन माझें ॥४॥प्रविलीन होतां सर्व जो प्रकाशे । नमस्कार त्यातें असो माझा ॥५॥नटेशा त्या देव ऋषि न जाणती । त्राता तो आम्हांसी होवो सदा ॥६॥दर्शनार्थ ज्याच्या कष्टती महात्मे । दर्शन तो मातें देवो प्रभु ॥७॥निर्गुण असूनि स्वीकारी जो गुण । अचिंत्य निर्गुण निर्विकार ॥८॥अनंतशक्ति तो परब्रह्मरुप । नमन तयास असो माझें ॥९॥वाणी मनाहूनि असूनियां पर । चेतवी जो सर्व इंद्रियांसी ॥१०॥कैवल्यनाथा त्या निर्वाणप्रदासी । सर्वदा प्रणती असो माझी ॥११॥शांत, मूढ, घोररुपें जो प्रगटे । परी एकात्म्यातें नमस्कार ॥१२॥क्षेत्रज्ञ जो सर्वाध्यक्ष सर्वसाक्षी । जो मूळप्रकृति नमन तया ॥१३॥अखिलकारणा देवा, निष्कारणा । अद्भुतकारणा नमन तुज ॥१४॥वेद शास्त्र नद्या जेथ सिंधूसम । पावती विराम नमन तया ॥१५॥शरणागता मजसम पशूचेही । पाश जो निवारी अज्ञानाचे ॥१६॥दयाळा त्या समदृष्टि ईश्वरासी । भक्तपालकासी नमन असो ॥१७॥निरिच्छ ज्ञात्यांसी वैभव जो अर्पी । मुक्तता तो माझी करो वेगें ॥१८॥गातां जयाप्रति मोक्षही भक्तांसी । आवडे न, त्यासी नमस्कार ॥१९॥नेति नेति ऐशा निषेधें जो अंतीं । अवशिष्ट, त्यासी नमस्कार ॥२०॥गजदेहाची न आसक्ति मजसी । इच्छा दर्शनाची एक त्याच्या ॥२१॥अहंममातीत भक्तिचि जयातें । पावती तयातें नमन माझें ॥२२॥वासुदेव म्हणे ऐसें बहुविध । स्तवन गजेंद्र करी आर्त ॥२३॥(गजेंद्रोक्त स्तोत्र संपूर्ण) १६राया, स्तवनें या ब्रह्मयादिक कोणी । प्रगट होऊनि पातले न ॥१॥देवाधिदेव तैं भगवंत हरी । बैसे गरुडावरी भक्तास्तव ॥२॥शंखचक्रधारी देवादिकांसवें । आर्तत्राणा धांवे गदापाणी ॥३॥पाहूनि हरीतें पदांबुजीं त्याच्या । गजेंद्र अंबुजा अर्पी एका ॥४॥नारायणा, जगद्गुरो, भगवंता । नमस्कार माझा वदला घेईं ॥५॥सद्गदित कंठें बोलतां कष्टानें । बाहेरी काढिलें प्रभुनें तया ॥६॥विदारुनि नक्रमुख गजेंद्रासी । मुक्त हृषीकेशी स्वकरें करी ॥७॥वासुदेव म्हणे भक्तकल्पद्रुम । रक्षो नारायण भाविकांसी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 19, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP