स्कंध ९ वा - अध्याय ११ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


८२
व्यासपुत्र महामुनि । म्हणती नृपा, घे ऐकूनि ॥१॥
वसिष्ठांचा शिष्य राम । करी बहुविध यज्ञ ॥२॥
सर्व दिशांचेंही राज्य । राम अर्पी ऋत्विजांस ॥३॥
अलंकार वस्त्र पात्र । एक राम जानकीस ॥४॥
पाहूनियां तें औदार्य । रक्षीं तूंचि म्हणती आर्य ॥५॥
रामा, अप्राप्य आम्हांसी । तुझ्या सान्निध्यें नसेचि ॥६॥
तुझ्या कृपेनें हें ज्ञान । आतां कांहीं नसे न्यून ॥७॥
वासुदेव म्हणे मुनि । धन्य श्रीरामा वंदूनि ॥८॥

८३
पुढती एकदां गुप्त वेषें राम । हिंडतां दारुण समय येई ॥१॥
जारिणीसी एका पति कथी क्रोधें । आश्रय न तूतें सदनीं माझ्या ॥२॥
रामें स्त्रीलंपटें जानकीस्वीकार । केला तो प्रकार नसे एथें ॥३॥
ऐकूनि तें राम होई मनीं खिन्न । सीतेसी नेऊन त्यागी वनीं ॥४॥
दिवस तियेसी गेले होते कांही । वाल्मिकींच्या जाई आश्रमांत ॥५॥
कुश-लव नामें पुत्र तेज:पुंज । जाहले तियेस तयास्थानीं ॥६॥
वासुदेव म्हणे सीता भूविवरी । अंती प्रवेशली रामनामें ॥७॥

८४
अंगद तैं चित्रकेतु नामें पुत्र । होती सौमित्रांस भाग्यवंत ॥१॥
तक्ष, पुष्कल ते भरताचे दोन । सुबाहु, श्रुतसेन शत्रुघ्नाचे ॥२॥
सीता भूप्रवेशवृत्तांत रामास । कळतां मनास खेद त्याच्या ॥३॥
अंतीं बहु वर्षे करी अग्निसेवा । अनवाणी गेला वनामाजी ॥४॥
चरणकमळें भक्तहृदयांत । स्थापूनि वैकुंठ गांठी राम ॥५॥
वासुदेव म्हणे अगाध ते लीला । करुनियां गेला रामचंद्र ॥६॥

८५
निवेदिती शुक सेतुबंधनादि । लौकिकार्थ होती सकल क्रिया ॥१॥
आवश्यक रामा नव्हतें तें कांही । वानरांचें घेई ईश साह्य ॥२॥
गुणगान त्याचें तारील विश्वासी । धन्य सेवा त्याची घडली जयां ॥३॥
दर्शनही त्याचें घडलें जयांसी । धन्य ते या लोकीं जन्मूनियां ॥४॥
अनुयायित्व ज्यां लाभलें तयाचें । पादस्पर्श ज्यातें घडला त्याचा ॥५॥
पावले ते मुक्ति सर्व भाग्यवंत । श्रवणें या शांत होती जन ॥६॥
वासुदेव म्हणे अंतीं मोक्षलाभ । ऐकावें चरित्र यास्तव हें ॥७॥

८६
परीक्षितप्रश्नें रामाचें वर्तन । करिती कथन मुनि ऐका ॥१॥
बांधव तयाचे करिती दिग्विजया । वधूनि गंधर्वां, हरिती धन ॥२॥
लवणासुरातें वधूनि शत्रूघ्न । करी मधुवन मथुरायुक्त ॥३॥
लवण तो होता मधुदैत्यपुत्र । वसलें नगर ‘मथुरा’ तेथें ॥४॥
भक्तदर्शनार्थ अयोध्येंत राम । हिंडे तदा जन संतोषती ॥५॥
सुगंधि जलाचे घालूनियां सडे । केळी-पोफळीतें उभारिती ॥६॥
वासुदेव म्हणे गुढया तोरणांनीं । अभिव्यक्त जनीं करिती भाव ॥७॥

८७
रामावरी वृष्टि करिती पुष्पांची । अंतरांत भक्ती ऐसी बहु ॥१॥
श्रीराममंदिर नवरत्नांकित । अमूल्य अनंत वस्तु तेथें ॥२॥
उंबरठे द्वारीं होते प्रवालाचे । स्तंभ वैडूर्याचे हरित भूमि ॥३॥
स्फटिकाच्या भित्ति मौक्तिकमालिका । शोभती पताका दिव्य बहु ॥४॥
पुष्पमाला तेंवी सुगंधी पदार्थ । सिंचियेले तेथ सुटला गंध ॥५॥
उजळले दीप धूपाचा सुगंध । तेथें रामचंद्र सीतेसवें - ॥६॥
आनंदें राहूनि वर्णाश्रमधर्मे । राज्य उत्साहानें करीतसे ॥७॥
वासुदेव म्हणे श्रीराममंदिर । सुखाचें आगर भक्तजनां ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP