कृष्णजयंती - पृथ्वीची देवांस प्रार्थना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


असुर त्रासे त्रस्त धरा विधिपाशी । घेवोनी सुरांसी जात असे ॥१॥
दैत्य वृत्त कथी बहुत आक्रन्दे । स्फ़ुदोनियां रडे विधिपाशी ॥२॥
दया आली मग विधि काय करी । तयांसी साचारी कैलासी ने ॥३॥
शंकरासी वृत्त कथी ब्रह्मा आपण । म्हणत रक्षण करा आतां ॥४॥
धूर्जटिसीं कोप अत्यंत पातला । म्हणे आतां चला विष्णूपाशी ॥५॥
क्षीर सागरींचा जो शेषशयन । तया वर्तमान कळविती ॥६॥
विनायक म्हणे नारायणापाशी । सकळ शीघ्रेंसी पातले ते ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP