कृष्णजयंती - भ्रुणहत्या

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गर्भिणी राहिली देवकी कारागृही । कंस तो संदेही पडला की ॥१॥
बिड्या ठोकी त्यांसी ठेविला पाहारा । स्वस्थता अंतरा कैची त्यासी ॥२॥
प्रथम पुत्र झाला वसुदेवालागी । अर्पी कंसालागी सत्य शब्द ॥३॥
क्रूर अधर्मी तो चाण्डाल मनाचा । तया भ्रूणहत्येचा वीट नाही ॥४॥
अर्भक आपटीले दुष्टे शिळेवरी । दया न अंतरी त्याच्या मुळी ॥५॥
धरा हे खचली पाहोनी कृत्य नीच । सैतानाने नाच आरंभिला ॥६॥
सज्जनांसी दु:ख दुर्जनां आनंद । देत तो दुर्मद नीच कंस ॥७॥
ऐसे सहा गर्भ मारिले दैत्याने । थोर निष्ठूरपणे जाणावे की ॥८॥
विनायक म्हणे पुढील आख्यान । ऐका चित्त देऊन भाविक हो ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP