कृष्णजयंती - देवाची विष्णूस प्रार्थना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सकळांनी स्तुति तेव्हा आरंभिली । दया येवो भली आमुची की ॥१॥
सनातन धर्म दैत्ये बुडवीला । अनर्थ जाहला धरित्रीसी ॥२॥
गाईंची कत्तल ब्राह्मणांचा छळ । करिती प्रबळ दैत्येश्वर ॥३॥
वेदमार्ग नाम-शेष त्यांही केला । धर्म बुडविला पायांतळी ॥४॥
पाखंडाचा केला त्यानी पुरस्कार । साधु-तिरस्कार करिताती ॥५॥
वैष्णव धर्म सारा नष्ट प्राय झाला । आतां प्रबुद्धतेला धरा नाथा ॥६॥
रसातळासींही पृथिवी चालली । पाहिजे सोडविली भगवंता ॥७॥
तैसेच करी आतां अवतार घेई । धांवोनिया येई तारावया ॥८॥
विनायक म्हणे जागे झाले हरी । वाणी अशरीरी उद्भवली ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP