कृष्णजयंती - गोकुळांत आगमन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गोकुळांत आले प्रगटोनी देव । स्वामी रमाधव विश्वपती ॥१॥
गोकुळी आनंद स्वर्गात आनंद । सकळ आनंद होत तेव्हां ॥२॥
सकळ ऋषिनी देवा स्तवियेले । स्तुतिस्त्रोत्र केले सुरवरी ॥३॥
देवकार्यासाठी जगन्नाथ आले । महीसीं पातले नररुपे ॥४॥
योग्य काळी दैत्य, देवे, निवटीला । भूभार हरला जगताचा ॥५॥
धर्म संस्थापना करोनी जगती । अधर्मा उच्छेदिती भगवान ॥६॥
तोच पुण्य दिन आज की पातला । पाहिजे स्मरला मनोभावे ॥७॥
विनायक म्हणे आख्यान गोपाळाचे । वदवीले साचे काय बोलूं ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP