’ श्रीनाथलीलामृता ’ चे नवाहपारायण
नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.
’श्रीनाथलीलामृत ’ हा ग्रंथ नाथसिध्दांच्या चरित्रकथा गाणारा आणि नाथपंथीय विचारांचें विशदीकरण करणारा आहे. अभासकांना त्यांतून नाथपंथाचे स्वरुप समजून घेतां येईल. तसेंच भाविकांच्या दृष्टीनें या ग्रंथाचें पठण नाथकृपाप्राप्तीसाठीं महत्वाचे मानलें गेलें आहे. श्री. दत्तातेय ज्योतिपंत कुलकर्णी (३०६ कसबा पेठ, पुणें ११) यांनी या ग्रंथाचे सांप्रदायिकरित्या पठण आणि पारायण कसें करावें, त्याचा तपशील कळविला आहे, तो आम्ही वाचकांच्या सोयीसाठी सादर करीत आहोत:
सूर्योदयानंतर एक प्रहर आणि सूर्यास्तानंतर एक प्रहर याप्रमाणे नित्य नेमानें शुचिर्भूत होऊन या ग्रंथाचें पठण करावें. ज्यांना दोन्ही वेळ शक्य नाहीं, त्यांनी रोज सायंकाळी स्वच्छ हातपाय धुऊन्न एकाग्र चित्तानें थोडा वेळ पठण करण्याचा क्रम ठेवावा. या ग्रंथाचे नित्य वाचन -मनन केल्यानें नवनाथांसंबंधीं प्रेम निर्माण होऊन, नाथांची कृपा निःसंशय प्राप्त होईल.
या ग्रंथाचे नवाहपारायण करण्याची पध्दति आहे. अध्याय व ओव्य़ा यांची नऊ दिवसांची विभागणी अशी :
दिवस १
अध्याय १ ते ३
ओव्या ५८५
==
दिवस २
अध्याय ४ ते ६
ओव्या ६३०
==
दिवस ३
अध्याय ७ ते १०
ओव्या ७८१
==
दिवस ४
अध्याय ११ ते १५
ओव्या ७८६
==
दिवस ५
अध्याय १६ ते १९
ओव्या ६९०
==
दिवस ६
अध्याय २० ते २२
ओव्या ६३७
==
दिवस ७
अध्याय २३ ते २५
ओव्या ५२८
==
दिवस ८
अध्याय २६ ते २७
ओव्या ४७८
==
दिवस ९
अध्याय २८
ओव्या ३७९
==
नित्य शुचिर्भूत होऊन, मंगलाचरणपूर्वक ( गणेश, शारदा, गुरु यांच्या वंदनाचे श्लोक म्हणून ) वरील विभागणीप्रमाणें
नवाहपारायण निष्ठेनें करावें. पारायणाच्या समाप्तीच्या दिवशीं नाथांना प्रिय असलेला प्रसाद ( तांदुळ व उडीद यांच्या
भरडयाचे वडे- दह्यानें युक्त, जोंधळयाची ताकांत तयार केलेली खीर आणि हरभर्याच्या घुगर्या ) करावा. निष्ठापूर्वक केलेलें
पारायण नाथकृपेचा लाभ घडवितें आणि ग्रंथकार आदिनाथ भैरव यांनी अध्यायान्ती सांगितलेल्या फलश्रुतीचा प्रत्यय
आणून देतें.
अनुक्रमणिका
अध्याय क्रमांक १
ओवी संख्या १४५
मंगलचरण, गणेश-सरस्वती - गुरु -नमन; गीर्वाण-प्राकृत-ग्रंथकार-वंदन; संतश्रोत्यांना वंदन.
अध्याय क्रमांक २
ओवी संख्या २१७
पार्वतीला आदिनाथांचा उपदेश; मकरोदरांत्त मत्स्येंद्रोत्पत्ति; मत्स्येंद्रास आदिनाथांकडून दीक्षा.
अध्याय क्रमांक ३
ओवी संख्या २२३
गोमयांत गोरक्षवतार.
अध्याय क्रमांक ४
ओवी संख्या १७९
गोरक्षनाथांच्या प्रश्नांना मत्स्येंद्रांचीं योगगुह्यज्ञानात्मक उत्तरें; हाटकेश्वरीं गोरक्षनाथांची हठयोगसाधना; मत्स्येंद्र-गोरक्षांचें
शेषानें केलेलें स्वागत.
अध्याय क्रमांक ५
ओवी संख्या १७५
सद्बोध-सद्वृत्ति नामक दांपत्यास उपदेश; विजयनृपतीस नाथदीक्षा; गोरक्षपुराची उभारणी; नाथवरदाची गोरक्षपुरांत स्थापना.
अध्याय क्रमांक ६
ओवी संख्या २७६
चौरगी-जन्मकथन; सापत्नमातेमुळें हस्तपादच्छेदन; मत्स्येंद्र्कृपेनें संजीवन; मत्स्येंद्रनाथांकडून नाथदीक्षा; मत्स्येंद्र-आज्ञेनें
चौरंगीच्या माता-पित्यांचें वदरिकाश्रमीं गमन.
अध्याय क्रमांक ७
ओवी संख्या १६४
ब्रह्मसमंध बनलेला आनर्तदेशीचा राजा चक्रधर याचा गोरक्षकृपेनें उध्दार; सवाशेर पिठासाठीं मत्स्येंद्राचें सिंदूरपुरीत ज्ञानकथन;
लोकांकडून उपेक्षा; गोरक्षांचें चमत्कारदर्शन; सिंदूरपुरीचा राजा भाळचंद्र याचा उध्दार.
अध्याय क्रमांक ८
ओवी संख्या १६३
चर्मण्वतीतीरीं विष्णुनगरांत गोरक्षांकडून विप्रपुत्रांचें कर्णच्छेदन; विप्रपुत्रास गोरक्षनाथ झोळींत टाकतात; त्यास अपरोक्षज्ञानाचा
उपदेश; सहुरूंना वडा देण्यासाठीं स्वनेत्राचें दान.
अध्याय क्रमांक ९
ओवी संख्या २६१
नैषध राजा सुदर्शन व त्याची पत्नी लीलावती यांना समाधिलाभ; नष्टपुत्रप्राप्त्यर्थ लीलावतीचें मत्स्येंद्र -व्रताचरण.
अध्याय क्रमांक १०
ओवी संख्या १९३
बत्तीस शिराळें येथें नागपंचमीच्या दिवशीं गोरक्षनाथ असंख्य नाग निर्माण करतात; सोमदत्त राजा, विश्वश्रवा ऋषिपुत्र,
त्याची भार्या व त्याला मारणारा वाघ यांचा गोरक्षांकडून उध्दार.
अध्याय क्रमांक ११
ओवी संख्या १५२
चंद्रचूड-सुप्रभ-आख्यान; चर्पटीचें उपदेश -दीक्षाग्रहण; सुभद्राचा गोरक्षांकडून उध्दार.
अध्याय क्रमांक १२
ओवी संख्या १३१
पुष्करयात्रा; सिध्दमहंतांना गोरक्षांकडून तृप्तिभोजन.
अध्याय क्रमांक १३
ओवी संख्या ११८
चौरंगीनाथांचें नंदनवनांत गमन.
अध्याय क्रमांक १४
ओवी संख्या २०९
शापित गंधर्व आणि राजकन्या सुशीला यांच्या पोटीम भर्तृहरि, विक्रम, मैनावती व सुभटवीर्य यांचा जन्म; विक्रमाचा
अवंती-विजय; यथाकाल चारी भावंडाचे विवाह; विक्रमाची दिग्विजययात्रा.
अध्याय क्रमांक १५
ओवी संख्या १७५
भर्तृहरीचा विलास; सुमंत ब्राह्मणास दिव्य फळाची प्राप्ति; तो तें राजास देतोव व्याभिचारिणी राजपत्नीकडून हातोहाती ते फळ पुन्हां राजाकडे येतें; पत्नीच्या वर्तनामुळें भर्तृहरीस विरक्ति;
अध्याय क्रमांक १६
ओवी संख्या ८९
भर्तृहरीचा वनवास; राजपत्नी स्वतःस जाळून घेते; चर्पटीनाथ राजपत्नीस पुन्हा प्रकट करतात व पूर्वचरित्र सांगून तिचा
स्वीकार करायला सांगतात; भर्तृहरीचें पत्नीसह राजभवनांत पुनरागमन.
अध्याय क्रमांक १७
ओवी संख्या १८९
भर्तृहरीचा पिंगळा राणीसह राजभोग; पिंगळेच्या पतिनिष्ठेच्या परीक्षेसाठीं राजा शिकारींत मृत्यु पावल्याची खोटी वार्ता
राणीस कळवितो; राणीचा तत्काळ मृत्यु; राजाचा अनावर शोक व राज्यत्याग; गोरक्षनाथांची भेट; गोरक्षबोधानें शांत
झालेल्या भर्तृहरीचा नाथ्पंथस्वीकार.
अध्याय क्रमांक १८
ओवी संख्या २३७
भर्तृहरीची बहीण मैनावती आणि राजा त्रैलोक्यचंद्र ह्यांस गोपीचंद व चंपावती हीं अपत्यें होतात; त्रैलोक्यचंद्राचा मृत्यु;
मैनावतीस जालंधरनाथांचा अनुग्रह; गोपीचंदाची पत्नी मैनावती जालंधर-संबध विपरीत करुन सांगते; राजा जालंधरनाथास
लिदीच्या खड्ड्यांत टाकतो.
अध्याय क्रमांक १९
ओवी संख्या १७५
मैनावती गोपिचंदास मानवदेहाची नश्वरता सांगून सहुरुची महती पटवते; कानीफनाथांचे आगमन; त्यांचे पूर्ववृत्तकथन.
अध्याय क्रमांक २०
ओवी संख्या २९५
कानिफाचा गंगातीरीं निवास; जालंधर गुरुंचा शोध; गोरक्षभेट; गोरक्षांकडून उपदेश आणि जालंधरवार्ता; गोपीचंदाकडे कनिफाचे शिष्य जातात; राजा भयाकुल होतो; मैनावतीची पुत्ररक्षणासाठीं प्रार्थना; जालंधरनाथांचे प्रकटीकरण; गोपीचंदाचा नाथपंथस्वीकार.
अध्याय क्रमांक २१
ओवी संख्या १८९
गोपीचंदाचें स्वगृहीं भिक्षार्थ आगमन; राण्यांचा शोक; गोपीचंदाचें तीर्थाटण; भगिनी़ची भेट.
अध्याय क्रमांक २२
ओवी संख्या १५३
गोपीचंदाच्या शोकाकुल पत्नींना जालंधरनाथांचा उपदेश.
अध्याय क्रमांक २३
ओवी संख्या १३१
गोरक्ष-मारुति-संवाद; गोरक्षांचें मल्लाळ देशांत गमन.
अध्याय क्रमांक २४
ओवी संख्या २०६
मत्स्येंद्रनाथांचा स्त्री-राज्यांत प्रवेश; परिमळा रानीसह सुखोपभोग; गोरक्षनाथांचे आगमन.
अध्याय क्रमांक २५
ओवी संख्या १९१
गोरक्षनाथ मेनीनाथाला धुऊन मारतात आणि पुन्हा असंख्य मेनी निर्माण करतात.
अध्याय क्रमांक २६
ओवी संख्या १५८
दत्तात्रेय-गोरक्ष-भेट; परस्परांच्या सामर्थ्याची परिक्षा; दत्तात्रेयांचा उपदेश.
अध्याय क्रमांक २७
ओवी संख्या ३२०
शंकराचार्याकरवीं पाखंडखंडन व धर्मस्थापन; आचार्य-हस्तामलक - संवाद; कालभैरवाकडून परीक्षा.
अध्याय क्रमांक २८
ओवी संख्या ३७९
ज्ञानेश्वर-चरित्रः संन्यासी पुत्र म्हणून वेदमूर्तीकडून अवहेलना; रेडयाच्या तोंडून वेदोच्चार; इ०
एकूण ५४९३
N/A
References : N/A
Last Updated : February 06, 2020
TOP