(सुतकाचेमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, सातवा, नववा, या दिवशी द्विपाद, त्रिपाद, नक्षत्रे व कर्त्याचे जन्मनक्षत्र, रविवार, मंगळवार, शनिवार, व नंदातिथी वर्ज्य करुन, अस्थिसंचयन करावे. (आचमन करुन, एक दर्भाचे पवित्रक घालावे. अमंत्रक प्राणायाम करावा. पहिल्या पानावर लिहिल्याप्रमाणे, देशकालाचा उच्चार करावा.
फलप्राप्त्यर्थं (अपसव्य करावे.) ... गोत्रस्य .......प्रेतस्य प्रेतत्व निवृत्यर्थं अस्थिसंचयनं करिष्ये (उदक सोडावे. शमी-शाखेने अगर दर्भाने दूधमिश्रित पाणी घेऊन पुढील मंत्राने, चिता, तीन वेळ प्रोक्षण करावी. प्रत्येक वेळी मंत्र म्हणावा -)
शीतिके इति दमनोग्निस्त्रिष्टुप ॥
चितिप्रोक्षणे विनियोग: । शीतिकेशीति कावति ह्लादिके ह्लादिकावति ।
मंडूक्या३ सुसंगम इमं स्व १ ग्निं हर्षय ॥
(पायापासून शिरापर्यंत प्रोक्षण केल्यानंतर कर्ता, व वृध्द गृहस्थ यांनी अंगठा व करंगळीजवळचे बोट यांनी पायापासून, शिरापर्यंत सर्व अस्थि कुंभामध्ये भराव्यात व सर्व भस्म भरुन, गंगेमध्ये समुद्रात अगर अन्य चांगल्या जागेवर टाकावे.)
अस्थि ताबडतोब टाकावयाच्या नसतील तर
उपसर्पेति सुंकुसुक: पृथिवी मृत्यु: पितरोवात्रिष्टुप् ॥
गर्तेस्थिकुंभ निक्षेपणे विनियोग: ॥
उपसर्प मातरं भूमिमेतामुरुव्यचसं पृथिवीं शुशेर्वां ।
ऊर्णम्रदा युवतिर्दक्षिणावत एषात्वा पातु निऋते रुपस्थात् ॥
(या मंत्राने अस्थिकलश कर्त्याने खड्ड्यामधे ठेवावा.)
उच्छ्वंचस्वेति संकुसुकोमृत्यु: पितर: पृथ्वीवा प्रस्तारपंक्ति: ॥
गर्तेषांसुक्षेपणे विनियोग: । उच्छ्वंचस्व पृथिवि मा निबाधथा: सूपा यनास्मै भव सूपवंचना ।
माता पुत्रं यथा सिचाभ्येनं भूम ऊर्णुहि ॥
(या मंत्राने कुंभाभोवती खड्ड्यात माती घालावी.)
उच्छ्वंच मानेति सुंकुसुक: पृथ्वीमृत्यु: पितरोवा त्रिष्टुप् ॥
अस्तिकुंभ-समीपे जपे विनियोग: ॥
ॐ उच्छ्वंचमाना पृथिवी सुतिष्ठतु सहस्त्रंमित उप हि श्रयं तां ।
ते गृहासो घृतश्चतो भवंतु विश्वाहास्मै शरणा: संत्वत्र ॥
(हात जोडावेत.)
उत्तेस्तभ्नामीति संकुसुक: पथिवीपितरो-मृत्युपर्वात्रिष्टुप ॥
घटस्यमुखपिधाने विनियोग: । उर्ते स्तभ्नामि पृथिवीं त्वत्परीमं लोगं निदधन्मोऽअहंरिषं ।
एतां स्थूणां पितरो धारयंतुते त्वा यम: सादनाते मिनोतु ॥
(या मंत्राने, घटावर खापराचे झाकण ठेवावे व खड्डा बुजवावा व स्नान करावे.)
(चिताभूमीवर शेणाचे पाणी शिंपडावे. दक्षिणेकडे कोन करुन त्रिकोणी वेदी करावी. त्यावर हळद, गंध, तुलसीपत्र घालावे. मध्ये, पश्चिमेला, उत्तरेला, पूर्व अगर दक्षिणेला, एक असे चार, मातीचे कुंभ भरुन ठेवावेत. दक्षिणेकडे तोंड करुन बसावे. आचमन करुन एक दर्भाचे पवित्रक घालावे. अमंत्रक प्राणायाम करावा.
अद्यपूर्वोच्चरित वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां पुण्यतिथौ मम आत्मन: श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं (अपसव्य करावे.) गोत्रस्य .......... प्रेतस्य प्रेतत्व निवृत्यर्थं वेदिकाराधनं करिष्ये (उदक सोडावे. एका भांडयात पाणी घेऊन, त्यात तीळ, गंध, तुलसीपत्र व दर्भ घालून तिलोदक करावे.) गोत्राय..प्रेताय भोजनार्थमयंपिंड: पानार्थं चोदकुंभोदकमुपतिष्ठतां (मधल्या कुंभावर, पिंड द्यावा व तिलोदक द्यावे.) स्मशानवासिने रुद्रायायंपिंड: पानार्थं चोदकुंभोदकमुपतिष्ठतां (पश्चिम कुंभावर पिंड द्यावा व तिलोदक द्यावे.) स्मशान वासिनेभ्य: प्रेतेभ्योयंपिंड: पानार्थं चोदकुंभोदकमुपतिष्ठतां (उत्तरेकडील कुंभावर, पिंड द्यावा व तिलोदक द्यावे.) प्रेतसख्येयंपिंड: पानार्थं चोदकुंभोदकमुपतिष्ठतां (दक्षिण अगर पूर्वेकडील कुंभावर पिंड द्यावा व तिलोदक द्यावे.) तस्योपरि तिलोदकमुपतिष्ठतां (पीठाच्या चार पोलिका, चार छत्र्या, आठ पादुका कराव्यात व पुढील मंत्रांनी द्याव्यात. मधल्यापासून क्रमाने.)
एकां पोलिकां पादुकाद्वयं एकं छत्रंच कालायदहन पतये इदमुपतिष्ठतां ।
एकांपोलिकां पादुकाद्वयं छत्रं च मृत्यवेदहन पतये इदमुपतिष्ठतां ।
एकांपोलिकां पादुकाद्वयं छत्रं च यमाय दहनपतये इदमुपतिष्ठतां ।
यमश्वभ्यां एकां पोलिकां पादुकाद्वयं छत्रंच उपतिष्ठतां ।
अनादिनिधनोदेव: शंखचक्रगदाधर: । अक्षय्य: पुंडरीकाक्ष: प्रेतमुक्तिप्रदोभव ।
इदं सकुशतिलोदकं प्रेताप्यायनमस्तु अभिरम्यतां अभिरतास्म: ।
तिलोदक अश्म्यावर द्यावे व स्नान करावे.)