अंत्येष्टिसंस्कार - अस्थिसंचयनश्राध्द
हिंदू धर्मामध्ये जन्मापासून अंतापर्यंत, सोळा संस्कार सांगितले आहेत; त्यांतील, हा शेवटचा संस्कार.
(आचमन करुन एक दर्भाचे, पवित्रक घालावे. अमंत्रक प्राणायाम करावा.
अद्यपूर्वोच्चरित वर्तमान एवं गुण विशेषण, विशिष्टायां पुण्यतिथौ मम आत्मन: श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं....गोत्रस्य......प्रेतस्य प्रेतत्व विमोक्षार्थं अस्थिसंचयनश्राध्दं करिष्ये (उदक सोडावे व अपसव्य करावे. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तीळ, गंध, तुलसीपत्र व दर्भ घालून, तिलोदक करावे. पाण्याने जमिनीवर मंडल करुन त्यावर एक पान ठेवावे व त्यावर आपल्याकडे अग्र करुन एक दर्भ ठेवावा.)
... गोत्र .... प्रेत अस्थिसंचयनश्राध्दे अयंते क्षण उपतिष्ठतां (दक्षिणाग्र दर्भ, चटावर द्यावा.) ..... गोत्र .... प्रेत पाद्यमुपतिष्ठतां (तिलोदक द्यावे.) गोत्रस्य ..... प्रेतस्य .... अस्थिसंचयनश्राध्दे इदमासनमुपतिष्ठतां (दर्भ व तीळ द्यावे. चटाच्या पुढे एक द्रोण ठेवावा. त्यावर एक दर्भ ठेवावा. त्यात पाणी, गंध, तुलसीपत्र व तीळ घालावे.) ......गोत्र.....प्रेत अस्थिसंचयनश्राध्दे इदमर्घ्यं उपतिष्ठतां (वरील द्रोणातील अर्घ्य अंगठयावरुन चटावर द्यावे.) गोत्र .......... प्रेत अस्थिसंचयनश्राध्दे गंध माल्य तुलसीदल भृंगिराजपत्रमुपतिष्ठतां (गंध, तुलसीपत्र, माका फूल घालावे.) ......... गोत्र ........ प्रेत अस्थिसंचयनश्राध्दे आच्छादनार्थे तिला: उपतिष्ठतां (तीळ घालावे.) गोत्राय ... प्रेताय सूतकान्ते दास्यमानं आमान्नं तन्निष्क्रयंवासदक्षिणमुपतिष्ठतां (तिलोदक द्यावे.)
अस्थिसंचयनश्राध्दे पिंडप्रदानं करिष्ये (उदक सोडावे. पिंडाकरिता दक्षिणाग्र एक दर्भ, चटापुढे ठेवावा.) ............ गोत्राय.............. प्रेताय अस्थिसंचयनश्राध्दे अयंसक्तुपिंड उपतिष्ठतां (दर्भावर पिंड द्यावा.) पिंडोपरि तिलोदकमुपतिष्ठतां (तिलोदक द्यावे, पिंडाला हात लावावा. शक्तीप्रमाणे प्राणाचा निरोध करावा. थोडे पीठ घेऊन त्याचा वास घ्यावा व पिंडाजवळ ठेवावे. (अभ्यंजनांजने उपतिष्ठेतां (तूप व काजळ लावावे.) दशासूत्रमुपतिष्ठतां (उत्तरीचे सूत पिंडावर घालावे.) गंध तुलसीपत्रं भृंगिराजपत्रमुपतिष्ठतां (गंध, तुलसीपत्र, माका घालावा.) सूतकान्ते दास्यमानं तांबूलदक्षिणां चोपतिष्ठतां (तिलोदक द्यावे.) अनादिनिधनोदेव: शंखचक्रगदाधर: ।
अक्षय्यपुंडरीकाक्ष: प्रेतमुक्तिप्रदोभव ॥
इदं सकुशतिलोदकं प्रेताप्यायनमस्तु (सर्व तिलोदक, अंगठ्यावरुन अश्म्यावर द्यावे.) अभिरम्यतां अभिरतास्म: (पिंड पाण्यात सोडावे व स्नान करावे.)
N/A
References : N/A
Last Updated : January 20, 2022
TOP