अंत्येष्टिसंस्कार - दहाव्या दिवसाचा विधी
हिंदू धर्मामध्ये जन्मापासून अंतापर्यंत, सोळा संस्कार सांगितले आहेत; त्यांतील, हा शेवटचा संस्कार.
(आंघोळ करुन भात शिजवून घ्यावा. दक्षिणेकडे तोंड करुन बसावे. आचमन करुन एक दर्भाचे पवित्रक घालावे. अमंत्रक प्राणायाम करावा. सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे देशकालाचा उच्चार करावा.) फलप्राप्त्यर्थं (अपसव्य करावे.)
गोत्रस्य प्रेतस्य प्रेतत्व निवृत्त्या उत्तमलोकप्राप्त्यर्थं दशमदिनविधिं करिष्ये (उदक सोडावे.) तथा गोत्रस्य प्रेतस्य प्रेतत्व निवृत्त्या उत्तमलोक प्राप्त्यर्थं दशमेहनि दाहजनित तापोशमनार्थं मृत्तिकास्नानानि करिष्ये (उदक सोडावे.) तथा दाहजनित तृषोपशमनार्थं तिलतोयाञ्जलि दानं करिष्ये (उदक सोडावे.) नंतर नवव्या दिवशी लिहिल्याप्रमाणे मृत्तिकादि स्नाने तीन करावी व तिलांजलिदान करावे. नंतर नवव्या दिवशी केलेल्या वेदीवर पिंड द्यावा. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गंध, तुलसीपत्र, तीळ व दर्भ घालून तिलोदक करावे. अपसव्य करावे.)
गोत्रस्य प्रेतस्य दशमेहनि क्षुत्पिपासानिवृत्त्यर्थं एष भक्तपिंडस्त-रोपतिष्ठतां (वेदीवर दर्भ ठेवून त्यावर पिंड द्यावा.) तदुपरि तिलोदकमुपतिष्ठतां गोत्र प्रेत एतत्ते अभ्यंजनाञ्जने उपतिष्ठेतां (काजळ व तूप लावावे.) गोत्र प्रेत एतत्ते गंध माल्य तुलसीदल भृंगिराजपत्रमुपतिष्ठतां (गंध, तुलसीपत्र, माका घालावा.) धूपमुपतिष्ठतां, दीपमुपतिष्ठतां, दास्यमानं आमान्नमुपतिष्ठतां, दास्यमानं दक्षिणा उपतिष्ठतां, उपस्थानार्थे तिला: उपतिष्ठतां तृषानिवारणार्थे वासोदकमुपतिष्ठतां (उत्तरीचे पाणी घालावे.) चालनमुपतिष्ठतां (पिंडाला दर्भ लावावा.) अनादिनिधनो देव: शंखचक्रगदाधर: । अक्षय्य: पुंडरीकाक्ष: प्रेतमुक्तिप्रदो भव ॥
इदं पिंडदानं सकुशतिलोदकं प्रेताप्यायनमस्तु । अस्तुप्रेताप्यायनं (सर्व तिलोदक अंगठ्यावरुन अश्म्यावर द्यावे.) अभिरम्यतां अभिरतास्म: ।
N/A
References : N/A
Last Updated : January 20, 2022
TOP