विधींसाठी लागणारे सामान
सर्वसामान्य रोज लागणारे सामान
गंध, फूले, तुळशी, माका, दर्भ, तांब्या, पळी, भांडे, तीळ.
पहिल्या दिवशी लागणारे सामान
उंबराच्या समिधा ६, पिठाचे पिंड ६, तीळ तांदूळ तूप ५० ग्रँम, द्रोण १० तांब्या पंचपात्री पळी, आंब्याचे डहाळे, गाडगे, कफनाकरता कापड ४॥ मीटर, चटा करता पाने.
अस्थिसंचयनाकरिता सामान
गाडगी ५, गोमूत्र, दूध, तूप, हळद, तीळ, द्रोण २, पिठाचा पिंड १ व पादुका पोलिका छत्र याकरता पीठ पसाभर, भाताचे पिंड ४ त्याकरता भात किलोचा. चटाकरता पाने १०, केळीची पाने अगर पत्रावळी ४, चिमूटभर तांदूळ.
नवव्या दिवशीचे सामान
९ पिंडाकरता भात अर्ध्या किलोचा, ५ पिठाचे पिंड, त्याकरता पीठ २ पसे, हळद, तूप, काजळ, पाने चटाकरता व इतर १५, केळीची पाने अगर पत्रावळी ४, तीळ.
दहाव्या दिवसाचे सामान
तीळ, तांदूळ, तूप, हळद, भात अर्ध्या किलोचा, ६ पिंड करावेत. द्रोण ५, गाडगी ५, निशाणे पाच, पिठाचा पिंड १, पोलिका ५, पादुका १०, छत्र ५ पिठाची. अर्धा किलो तांदूळ, नारळ, डाळ, निरांजन, वस्त्र, गोडे तेल, उदबत्ती.
अकराव्या दिवसाचे सामान
गोमूत्र, गाईचे दूध, गाईचे शेण, गाईचे दही व गाईचे तूप पंचगव्याकरता जानवी, प्रायश्चित्ते दशदाने व दोन गोप्रदाने यांचे द्रव्य व किरकोळ पैसे, दूध, गूळ, वगैरे विडयाची पाने २५, सुपार्या २५, भात अर्ध्या किलोचा, तीळ, दर्भ, तूप, अक्षता, शेणी, सळपे, चटाकरता पाने १०, आंब्याचा ढाळा.
बाराव्या दिवसाचे सामान
पूजासाहित्य, १९ पिंड करण्याकरता पीठ पाव किलो, सुपार्या ४०, चटाकरता पाने ३०, केळीची पाने १०, गोप्रदाने द्रव्य, सपिंडीकरता द्रव्य विड्याची पाने २५, ताम्हने ४, मध, तूप, दही, पर्व स्यंपाक आमान्ने ३, वस्त्र १, तांब्या पळी भांडे.
तेराव्या दिवशीचे सामान
जानवी, पंचगव्याचे सामान, पूजासाहित्य, भात १ पायली, तांदूळ १ शेर सुपार्या ३०, गाडगे १, पंचपात्र्या, द्रोण ६, विड्याची पाने ३०, तांब्या ताम्हने २, शांतीकरता व आचार्यांची देणगी याकरता द्रव्य.