मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
सप्ताहाचा अध्यायानुक्रम

गुरूचरित्र - सप्ताहाचा अध्यायानुक्रम

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


'धारवाड' प्रत धारवाडवृत्त छापखान्यांत छापलेली. शिळाछाप---शके १७९५ (छापी प्रतींची यादी ' अनुक्रमांक ९) या प्रतीमधील सप्ताहाचा अध्यायानुक्रम प्रत्येक दिवसाच्या ओवीसंख्येसहित मागील यादींत दिला आहे. इकडे त्या संबंधींच्या त्या प्रतींतील ओंव्याच देतों—“प्रथम दिवसापासोन । बसावया असावें एकस्थान । अतत्त्वार्थ भाषणीं धरावें मौन । कामादि नियम राखावे || दीप असावा शोभायमान। देव-ब्राह्मण वडिलां वंदोन । पूर्वोत्तर मुख करून । वाचनीं आरंभ करावा  ॥सप्तसंख्या अध्याय प्रथम दिनीं । सप्तदशपर्यंत द्वितीय दिनीं । सप्तविंशति तृतीय दिनीं । त्रयस्त्रिंश चतुर्थ दिवशीं | छत्तीसपर्यंत गं पांचवे दिनीं । बेचाळीसवरी सहावे दिनीं । सप्तमीं एकावन्न वाचोनी । सप्ताह पूर्ण करावा ॥ नित्यपाठ होतां पूर्ण । करावें उत्तरांग पूजन । श्रीगुरूतें नमस्कारून । उपहार कांहीं करावा ॥ याप्रकारें करावें सप्तदिन । रात्रीं करावें भूमिशयन । सारांश शास्त्राधारे करून । शुचिर्भूत असावें ॥ " इत्यादि. याप्रमाणे पाहातां सप्ताहाचा अध्यायक्रम ७|१७|२७|३३|३६|४२|५१ असा पडतों. हे पुस्तक शके १७९५ मध्ये छापलेलें लक्षांत घेतलें असतां व यानंतर छापलेल्या पुस्तकांतील अवतरणिकेमधील सप्ताहक्रम ९।२१।२९।३५।३८।४३।५१ असा असलेला पाहातां, हाच पुढें कोणीतरी बदलला असला पाहिजे हें निश्चित होतें. आमचा अवतरणिका अध्याय छापून गेल्यानंतर वरील प्रमाण मला मिळालें. हें पाहातां खालीं टीपेंत दिलेले पाठ वर मूळ ओंव्यांतच घालणे अयोग्य नव्हतें असे वाटलें. (श्रीटेंभेस्वामी-प्रतीचाही त्यास आधार आहे.)
‘आंबेवाडी' प्रत---(लेखी, शक १७१७) सप्ताहाचे अध्याय---८ । १७ । २७ । ३३ | ३६ | ४५ । ५१ ।
'चिकोडी’---(लेखी, १७८३) सप्ताहाचे अध्याय---७ । १७ । २८ । ३४ । ३७ । ४२ । ५१.
'टेंब्येस्वामी' प्रत---(लेखी, १७८२) "प्रथम दिने अध्याय ७, द्वितीय दिने अध्याय ११, तृतीय दिने अ० १०, चतुर्थ दिने अ० ६, पंचम दिने ३, पष्ट दिने ६, सप्तम दिने ८; एवमेकपंचाशदध्यायाः (५१)  ॥ अथ त्रिपु दिनेषु पाठं करिष्यमाणश्चेत् प्रथम दिने २२, द्वितीय दिने १४, तृतीय दिने १५ एवमेकपंचाशदध्यायाः (५१)’  ॥या प्रतीवरून पाहातां सप्ताहाचा अध्यायानुक्रम- ७ । १८ । २८ । ३४ । ३७ । ४३ । ५१ असाच पडतो. 'धुळेच्या 'कडगंची' प्रतीच्या शेवटीं हाच अनुक्रम लिहिलेला आहे. म्हणून आम्हीं हाच अनुक्रम पसंत केला असून प्रत्येक अध्यायाच्या ओवीसंख्येचा तपशील पुढें दिला आहे.

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP