अग्निपुराणांत सांगितलेले हविष्यान्नाचे जिन्नस
व्रीहिषष्टिक मुद्राश्र कलायाः सतिलं पथ: । श्यामाकाश्चैव नीवारा गोधूमाद्या व्रते हिताः ॥१॥
कूष्माण्डालाचुवार्ताकपालीज्योत्स्निकास्त्यजेत् । चरुभैक्षं सक्तुकणाः शाकं दधि घृतं मधु ॥२॥
श्यामाकाः शालिनीवारा यावकं मूलतण्डुलम् । हविष्यव्रतनक्तादावग्निकार्यादिके हितम् ॥३॥
अर्थ-साळीचे तांदूळ, साठ दिवसांनी पिकणार्या भाताचे तांदूळ, मूग, वाटाणे, तिल, दूध, सांवे, तृणधान्य व गहूं इत्यादिक हे व्रताविषयीं हितकारक आहेत. कोहाळा, भोंपळा, वांगें, पोईशाक, घोसाळें हीं वर्ज्य करावीं. हुतशेष, भिक्षा मागून मिळालेलें अन्न, पीठ, कण्या, शाक, दहीं, तूप, मधु, सांवे, साळीचे तांदूळ, तृणधान्य, यव, मुळा, तांदुळजा हे पदार्थ हविष्यव्रत नक्त इत्यादिकांविषयीं व अग्निकार्य इत्यादिकां विषयीं हितकारक होत.
---कृ. वि. सोमण
----
* गाणगापूरचे अर्चक वे. दत्तात्रेय शंकर भट पुजारी यांचे चुलते वे. गुरुभटजी यांजकडून वरील ५ वा संकल्प व हे नियम समजले. याबद्दल त्यांचे आभार आहेत. (हे नियम श्रीटेंभेस्वामीकडून समजले असें ते सांगतात.)