मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
शास्त्रोक्त 'संकल्प'

गुरूचरित्र - शास्त्रोक्त 'संकल्प'

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


श्रीगुरुचरित्रसप्ताह किंवा पारायणअनुष्ठान करितांना कामनेनुसार करण्याचे शास्त्रोक्त 'संकल्प'

आचमन, प्राणायाम व देशकालादिकांचा उच्चार झाल्यावर, ज्या उद्देशाने हें अनुष्ठान करावयाचें असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला तो आपला हेतु निवेदन करून, त्या देवतेच्या कृपेनें तो हेतु पूर्ण होण्यासाठीं मी हें (अमुक) कर्म करितों असे म्हणून पाणी सोडावयाचें असतें, त्याला 'संकल्प' म्हणतात. हें संकल्प थोर पुरुषांनी आपापल्या कल्पनेनुसार शास्त्राधारें बसविले आहेत. ते तशा योग्य पुरुषांकडून विचारून घेऊन खालीं दिले आहेत, ते वाचून त्यांतून आपणास जो आवडेल तो घेण्यास हरकत नाही.
(आचमनादि झाल्यानंतर) श्रीमन्महागणाधिपतये नमः  ॥मातापितृभ्यो नमः । इष्टदेवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः । आदित्यादिनवग्रह देवताभ्यो नमः । सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमोनमः । एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः । (आपल्या पद्धतीप्रमाणें देशकालादिकांचा उच्चार करून) एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोकलप्राप्त्यर्थं अस्माकं लकुटुंबानां सपरिवाराणां द्विपदचतुष्पदसहितानां क्षेमस्थैर्यायुरारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं समस्ताभ्युदयार्थं च श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-दत्तात्रेय देवताप्रीत्यर्थ सर्वारिष्ट-शांतिपूर्वक-सकलमंगलवाप्त्यर्थं श्रीगुरुचरित्रसप्ताहपारायणं करिष्ये । तदंगत्वेन पुस्तकरूपी श्रीगुरुदत्तात्रेयपूजनं च करिष्ये । तथा आसनादिकलशशंखघटादीप- पूजनं च करिष्ये” (असें म्हणून पाणी सोडून, आसन, न्यास, कलशपूजा, तसेंच शंख-घंटा-दीप यांची पूजा करून गु. च. पुस्तकाची पूजा करावी व नंतर वाचण्यास आरंभ करावा. आचमनास आरंभ करण्यापूर्वी घरांतील देव व वडील माणसें यांना वंदन करून पुढील कार्यास अनुशा घेऊन बसावें. सात दिवस पोथीकडे अखंड दीप ठेवावा. वाचन चालू असेपर्यंत तुपाचा दीप ठेवावा.)

२ मुमुक्षुने करणेचा संकल्प- (एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ) मम वर्णाश्रमोचित-कर्मानुष्ठान-श्रद्धाद्वारा तदनुष्ठानजनित-चित्तशुद्धिसंपादित साधनचतुष्टयसमासादित–आत्मविचारणासंजात-प्रत्यग्व्रह्मैक्यानुसंधाननिष्ठा-निरस्ताशेष-अनर्थव्रातताद्वसमुद्बोधित-अखण्डानंदसाक्षात्काररूप ब्रह्मप्राप्त्यर्थं, सर्वारिष्टशान्ति-पूर्वक-समस्तमंगलावाप्यर्थं, त्रयस्त्रिंशत्कोटिदेवतास्वरूप-ब्रह्महरिहरात्मक-श्रीगुरुदत्तात्रेयदेवताप्रीत्यर्थं श्रीगुरुचरित्रसप्ताहपारायणं करिष्ये । इत्यादि.

३ सार्वजनिक कल्याणाकरितां म्हणजे राष्ट्रहिताकरितां करणेचा संकल्प- (एवंगुणविशेषण)-आस्मिन् भारतवर्षीय जनानां क्षेमस्थैर्य-ऐश्र्वर्या-भिवृद्धयर्थं धर्म-अविरुद्ध-स्वातंत्र्यप्राप्त्यर्थं स्वातंत्र्यमध्येषु सकलशत्रुविनाशनायें, तत् शत्रुसंहारक-तेजोबलवीर्यप्राप्त्यर्थं सकलभयनिरसनार्थ, अभयसिद्ध्यर्थं च श्रीदत्तात्रेयदेवताप्रीत्यर्थं श्रीगुरुचरित्रसप्ताहपारायणाख्यं (अथवा अमुक) कर्म करिष्ये इत्यादि-

४ दुसर्‍याकरितां सप्ताह करितांना म्हणणेचा संकल्प—अमुक गोत्रोत्पनेन अमुक शर्मणा वृतोऽहं जमानस्थ (स्त्री असेल तर ‘यजमान्याया:’) श्रीदत्तात्रेयदेवताप्रीतिद्वारा इष्टकामनासिद्धयर्थं श्रीगुरुचरित्रसप्ताहपारायणं करिष्ये. तदंगत्वेन पुस्तकरूपी० इत्यादि---

५ सर्वसाधारण लोकांकरितां सोपा संकल्प---(एवं गुण०) मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं मम मनेप्सित कार्यसिद्धयर्थं (दुसर्‍याकरितां असेल तर 'मम यजमानस्य मनेप्सितकार्यसिद्धयर्थं') श्रीपादश्रीवल्लभ-नरसिंहसरस्वती- दत्तात्रेयदेवता-प्रीत्यर्थं श्रीगुरुचरित्रसप्ताहपारायणं करिष्ये०-इत्यादि---

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP