आत्मज्ञानी भजनी पदे - गण १ ला
महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे.
जे निरंजन निर्गुणा माझी प्रार्थना आहे तुम्हांसी ॥
तू अविनाशी गुणनिधी प्रसन्न होय मशी ॥
तू अगाध सूत्रधारी घडामोड करि नेई स्वरुपासी ॥
तुजपासुन्नि झाले शिवशक्ती उत्पन्न ऐशी ॥
यावे सभेमध्ये महाराज अविनाश राज रक्ष आम्हांसी ॥
तुजविण कोण तारी या प्रसंगाशी ॥
शुध्द मुनि गुरु भीमराव ज्ञानाचा ठाव दाखवि आम्हांसी ॥
गणपति कवि लागे चरणांसी ॥१॥
अवताराचे पद
माझे रंगले मन । दहा अवतार मौजेनं ॥धृ०॥
पहिला अवतार मच्छ साक्षात ॥
केली जलामध्यें मात ॥
शंखासुर वधिला त्वरित ॥
वेद आले हातांत ॥
त्यासि ब्रह्मा झाला प्रसन्न ॥
माझे रंगले मन ॥
दहा अवतार गाईन मौजेनं । माझे० ॥ १ ॥
॥ दुसरा अवतार कूर्माचा ।
तार हरि भक्तांचा । पृष्ठी भार वाहिला सृष्टीचा ॥
आणिक या शेषाचा । काय वर्णू याचे गुण ॥
माझे रंगले मन । दहा अवतार गाईन मौजेन । माझे० ॥२॥
तिसरा अवतार पै गाढा । पृथ्वी धरियेली दाढा ॥
दैत्य मारुन केला रगाडा । नाही उरला हा जोडा ॥
हे काय शस्त्रांचे सहस्त्र गुण । माझे रंगले मन ॥
दहा अवतार० ॥३॥
चौथा नारसिंह विक्राळ । दुसमानाचा काळ ॥
हिरण्यकश्यप वधिला तात्काळ । प्रल्हाद त्याचे बाळ ॥
तोडितसे भक्तांचे बंधन । माझें रंगले मन । दहा० ॥४॥
पांचवा अवतार हरि वामन । मागूं गेले दान ।
बळीस पाताळी घालून । रक्षपाळ होऊन ॥
शुक्राचा नयन फोडून । माझे रंगलें मन । दहा० ॥५॥
सहावा अवतार परशूधर । परशुराम अवतार ।
सहस्त्रार्जुन वधिला सहस्त्रकर । भूमिसीं ज्याचा भार ।
कैक राजे येती शरण । माझे रंगले मन । दहा० ॥६॥
रामे शिळासेतु बांधून । वधिला हा रावण ॥
लंका दिधली ही दान । निजभक्त बिभीषण ।
माझे रंगले मन । दहा० ॥ ७ ॥
आठव अवतार हरि वनमाळी । खेळे खेळे गोकुळी ॥
गोपीसंगे करितो धुमाळी । कृष्ण वाजवी मुरली ॥
कंस मामा निर्दाळूण । माझे रंगले मन । दहा० ॥८ ॥
नववे अवतारी धरली मोहूनी । श्रम जाहले म्हणूनी ।
पाप आचरती सर्व जन । नीच जातीसी मान ॥
ऐसे खेळ खेळला भगवान । माझें रंगले मन । दहा० ॥९ ॥
दहावे अवतारे करील मात । होईल विश्वाचा हा घात ॥
नारायण विनवितो हरिभक्त । जोडुनी दोन्ही हस्त ॥
भेटी मागतसे तव चरण । माझे रंगले मन । दहा० ॥१० ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 27, 2024
TOP