बीजमार्ग ईश्वर दाखविला सद्गुरुने नयनी । बिंब पाहता दंग झाले नित्य हरीभजनी ॥धृ०॥
परा वाचा करणी पश्चंती स्थिरावली नयनी । भूचरी नासिकी तेथून नाड्या चाले तिन्ही ।
वैखरी मुखामधी अर्थ जाणतात ज्ञानी । अनिर्वाच्य वर्तन असे सत्राविच्या गमनी ॥१॥
त्रिकूट भुवनी ब्रह्मदेव सावित्री ऋग्वेद करणी । श्रीहरी विष्णु लक्ष्मी यजुर्वेद आसनी ॥
गोलाहाटा शंभु पार्वती सामवेद गायनी । सप्तसूर छत्तिस रागिण्य़ा उठे सोहम्‍ ध्वनी ॥२॥
त्यावर अर्धि मात्रा तुर्या अथर्वण पठनी । ओंकाराच्या वाम अंगी तुर्या जाणतात ज्ञानी ।
त्यावर महाबीज कैलास घाट तेथूनी । प्रेम पांचवा वेद तेथे वतनदारी जुनी ॥३॥
अमोलबिंदु ईश्वर प्रकाश पडे कैलासभुवनी । तेथे वेदांची वाचा थकली मोक्षमार्ग करणी ॥
डोळा डोळ्यांत जिरला आत्मदेव स्वरुपी मिळुनी । कवि गणपति आत्मज्ञानी लागे निजरुप ध्यानी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP