मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निराकारी व एकतारी भजनीपदे|आत्मज्ञानी पदे| पद ५ आत्मज्ञानी पदे गण १ ला गौळण पद १ पद २ पद ३ पद ४ पद ५ पद ६ पद ७ पद ८ पद ९ पद १० आत्मज्ञानी भजनी पदे - पद ५ महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे. Tags : bhajanekatarimarathipadएकतारीपदभजनमराठी पद ५ Translation - भाषांतर परद्वाराचे सुख काय सांगु तुला साजणी । परपुरुष भोगला परंतु डाग नाही अजुनी ॥धृ०॥बोधाच्या मदनांत बाई भुलले खरोखर । चित्त चैतन्यामधिं टाकुनी पलंग हवाशीर । विवेकाची पानसुपारी सत्त्व कात वर । शांती गुडगुडी दया छापी क्षमा तमाखुचा धूर ॥सत्रावीचे जळ ते वेळां भरले आणूनी । घडोघडी रंग करितो साजन बहुगुनी ॥१॥क्रोध माझा भ्रतार कधी जाऊ देईना द्वारी । अहंकार सासरा होता पूर्वीचा वैरी ॥असे कुटाळिन नणंद तिची जप्ती मजवरी । कल्पना सासु तोंडवळ राग दीर जाच करी ॥मदमत्सर मोहांत वेढले होतें सखे गडनी । इतक्यांसी दगा देऊनि आले ब्रह्मरुप धरुनी ॥२॥लक्षीतुन जाईना पाहिले बाई निज बीज । सखे भावाच्या गेले पलंगावर केवढे धाडीज ॥औटपीठ ओलांडतां दिसले उन्मनीचे राज । सोळा मात्रा भोवताली अनुहात बाजा नित्य वाजे ॥महाबीज शून्यावर परब्रह्म बसले निजध्यानी । अगाध रुप पाहोनि सखयाचे दंग झाले मनी ॥३॥लाज सोडून निर्लज्जा झाले अमळरुप पहातां । केला संग पुरुषासी द्वैतभाव निवाला संचिता ॥गेले रुपाला रुप मिळोनी मोक्षाचा दाता । वडगांव आमली ठिकाणा कवि हा आत्मज्ञानी पुरता ॥सावतळराजा प्रसन्न गुरु भीमराज दत्त चरणी । गणपत कवि आत्मज्ञानीची बिकट रामवाणी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP