क्षणभंगुर संसार घडीची कायापुर वस्ती । नाम किराना अमोल्य वस्तु भरा महाग वस्ती ॥धृ०॥
लक्ष चौर्‍यांयशी योनी हिंडत किती भटकत फिरसी । वृक्षांमाजी वीस लक्ष योनी ऊन वारा झुरशी ॥
दहालक्ष पक्षी गिरीकंदरी चार सरसी । नवलक्ष जलचरें अकरा लक्ष कीटक धरिसी ।
तीन लक्ष अच्येस्थळी चार लक्ष मानव असती ॥१॥
लक्ष चौर्‍यांयशी योनी हिंडता जीव पातकांत गरळ । दर योनी कोटी फेरी बसली मग जिवासी सरळ ।
म्हणून नाम किराना भरावा हा मार्ग सरळ । दिवस आहे तोंवर करा सौदा नका फोडु परळ ।
दिवस गेलेवर पडेल फांसा यमाची तस्ती ॥२॥
ज्याचे त्याचेपाशी असून गवसेना ना कळता फसला । कां भटकत हिंडता बाहेर आंत उंदीर घुसला ॥
ब्रह्म साधुनी परब्रह्म होणे आत्मबोध ठरला । गुरुवाचून कधि कळेना आत्मज्ञान भासला ॥
काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकारास दे तस्ती ॥३॥
सत्राचीवे जीवन घ्यावे उलटी वाहे भद्रा । परब्रह्म अविनाश दसवे द्वारी ओंकार बीज रुद्रा ।
व्यक्ता अव्यक्तासी भेटावे लावुनियां मुद्रा । रामनाम तारक मंत्र घे माम पदरा ।
गुरु भीमराव कवि गणपति खेळे आत्मज्ञानी कुस्ती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP