बालगीत - चंदाराणी , का गं दिसतेस...
बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children.
चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावानी ॥धृ.॥
शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा
रात्रभर तू चाल चालसी, दिवसातरी मग कोठे निजसी ॥१॥
वारा वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा
कसा गडे तू तोल राखिसी, पुढती पुढती पाय टाकिसी ॥२॥
काठी देखील नसते हाथी, थोडी नाही विश्रांती
चढती कैसी, कशी उतरसी निळ्या डोंगरी अखंड फिरशी ॥३॥
वाडा घरकुल घरटे नाही, आई नाही अंगाई
म्हणूनिच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी ॥४॥
गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : आशा भोसले
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018

TOP