कृष्णा घालीतो लोळण, यशोदा आली ती धाऊन
काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
एक नाही दोन नाही बेरीज-वजाबाकी नाही
तीन नाही चार नाही भूमितीची सजा नाही
दिवस उद्याचा सवडीचा
रविवार माझ्या आवडीचा ॥ धृ॥