बालगीत - रस्ते साफ , घरे साफ , सग...
बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children
रस्ते साफ, घरे साफ,
सगळीकडे साफ साफ
रस्त्यात घाण टाकायची नाही,
घरात घाण ठेवायची नाही,
स्टेशनवर ? उं हूं
फूटपाथवर ? उं हूं
अंगणामध्ये ? उं हूं
बागेमध्ये ? उं हूं
मग कचरा कुठे टाकणार?
टोपलीमध्ये
रद्दी कागद ?
टोपलीमध्ये
टोपली केराने भरली तर ?
रस्त्यावरच्या डब्यामध्ये
डबा केराने भरला तर ?
म्युनिसिपालटीच्या गाडीमध्ये
गाडी केराने भरली तर ?
गाडीतला कचरा दूर नेतात,
दूर नेऊन जाळून टाकतात
आपली घरे साफ होतात
आपले रस्ते साफ होतात
आपली गावे साफ होतात
रस्ते साफ, घरे साफ,
सगळीकडे साफ साफ.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018

TOP