एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन
एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन
आली गिर्हाईके छान छान
आली गिर्हाईके छान छान छान छान
एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन
मनी ने आणले पैसे नवे
म्हणाली शेटजी उंदीर हवे
मनी ने आणले पैसे नवे
म्हणाली शेटजी उंदीर हवे
छान छान छान
एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन
अस्वल आले नाचवीत पाय
म्हणाले मधाचा भाव काय
अस्वल आले नाचवीत पाय
म्हणाले मधाचा भाव काय
छान छान छान
एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन
कोल्ह्याने मागीतला गुळाचा रवा
आणि म्हणाला मांडून ठेवा
माकड म्हणाले लावुन गंध
आता झालय दुकान बंद
छान छान छान
एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन