बालगीत - एक नाही दोन नाही बेरीज-वज...
बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children
एक नाही दोन नाही बेरीज-वजाबाकी नाही
तीन नाही चार नाही भूमितीची सजा नाही
दिवस उद्याचा सवडीचा
रविवार माझ्या आवडीचा ॥धृ॥
सोमवारचा असतो गणिताचा तास
गणिताच्या तासाला मी नापास
गणित विषय माझ्या नावडीचा
रविवार माझ्या आवडीचा ॥१॥
भलताच कठीण तो मंगळवार
डोक्यावर असतो भूगोलाचा भार
भूगोल विषय माझ्या नावडीचा
रविवार माझ्या आवडीचा ॥२॥
घेऊन तोफा आणि तलवारी
इतिहास येतो बुधवारी
इतिहास माझ्या नावडीचा
रविवार माझ्या आवडीचा ॥३॥
माऊच्या कुशीत झोपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्लं दोन
मिचमिच डोळे, टिल्ले कान
माऊची पिल्लं गोरीपान !
N/A
References : N/A
Last Updated : December 09, 2007

TOP