बालगीत - पाण्यात ढग आणि ढगात पाणी ...
बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children
पाण्यात ढग आणि ढगात पाणी
म्हणून पाऊस म्हणतो गाणी
रानात ऊन उन्हात रान
म्हणून हिरवळ फुलते छान
वार्यात गंध गंधात वारा
म्हणून पाखरांना झाडनिवारा
पानांच्या कानात फुलांचे डूल
म्हणून तर रानाला पडते भूल
गगनात चंद्र चंद्रात गगन
धरतीवर चांदणे छुम्छनन्छन् !
N/A
References :
कवी - अशोक बागवे
Last Updated : January 17, 2018

TOP