थंडीने कुडकुडत असलेले व भुकेने व्याकूळ झालेले एक चिलट एके दिवशी सकाळी एक, मधमाशांच्या पोळ्यापाशी गेले व मधमाशांस म्हणाले, 'माझ्या जेवणाखाण्याची व कपड्यांची व्यवस्था तुम्ही जर केलीत तर मी तुमच्या मुलांना गाणं शिकवीन.' हे ऐकून मधमाशी त्यास म्हणाली, 'अरे, आमच्या मुलांनी स्वतः उद्योग करून आपलं पोट कसं भरावं ते शिक्षण आम्ही त्यांना देतो. अशा वेळी ज्या गाण्याचा उपयोग तुला स्वतःला होत नाही ते आमच्या मुलांना शिकवून काय फायदा ?'
तात्पर्य - जी कला शिकून आपला चरितार्थ चालविणे शक्य होत नाही. त्या कलेपेक्षा ज्या उद्योगाने आपले पोट भरू शकेल असा उद्योग शिकणेच अधिक चांगले होय.