संग्रह १ ते २०

लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.


१.

बुलढाण्याला जातांना लागतो अजिंठयाचा घाट

x x x रावांचा आहे पाटलांसारखा थाट.

२.

कपाशीचं शेत बोंडांनीं फुललं, भिरभिर नजर टाकतांना

x x x पाटील खुललं.

३.

जवारीचं पीक मोत्यांचे दाणे, भरल्या शेतांतून चालले

x x x पाटील राणे.

४.

शेतीचे दागिने नांगर, ईळा, कोयता, मी रांधते बिगी बिगी

x x x पाटील खातो आयता.

५.

बुलढाण्याच्या घाटांतून मोटार चालली वळणानं लक्ष्मीसंगं

x x x बुवा गप्पा करतात ऐटीनं.

६.

विद्येचा अभिमान नसावा, स्वाभिमान देशाचा राखावा

x x x रावांसह करावी मी स्वदेशाची सेवा.

७.

कन्या होतें मी मातृगृहीं, स्नुषा होऊनी आले सासरीं

x x x राव पति मिळाले भाग्यवान मी ठरलें खरी.

८.

लालन पालन आजवरी मातेचं पांघरुण मायेचं

x x x पति मिळाले जीवन सौंगडी खरंच नशीब माझं भाग्याचं.

९.

ह्रुदयाची श्रीमंती, नीति, धर्म न त्यजीन कधीं

x x x रावांचे लाभो सहकार्य विनंती थोरपदीं.

१०.

कुणाची करुं नये निंदा, कुणाचं काढूं नये वर्म,

x x x रावांच्या जीवावर हाच पाळीन धर्म.

११.

ऋण काढून सण करणं संसाराला दूषण

x x x रावांच्या सह मानानं जगणं हेंच आहे भूषण.

१२.

मानापानासाठी खोटेपणा नसावा

x x x रावांच्या पत्नीनं हाच नियम पाळावा.

१३.

धनदौलत मिळवतांना लाचलुचपत नसावी

x x x रावांची पत सर्व लोकांत असावी.

१४.

नोकरी असो, धंदा असो, नीतिमत्ता पाळावी

x x x रावांच्या सहवासात सुंदर तत्त्वें असावी.

१५.

यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली

x x x रावांच्या जिवावर सगळी हौस माझी पुरली.

१६.

देशांत देश हिंदुस्थान सरसा

x x x रावांना घास घालतें गोड अनारसा.

१७.

तूप वाढण्याला घेतें चांदीचा चमचा

x x x रावांना घास घालतें बुंदीच्या लाडूचा.

१८.

नागपूर माझें माहेर, नाशिक माझें गांव,

x x x रावांचें नांव घेतें शेवंती माझें नांव.

१९.

लावीत होते कुंकूं, त्यांत होतें मोतीं

x x x रावांसारखे भर्तार जन्मोजन्मीं चिंतीं.

२०.

चंदनाचे पाट त्यावे रुप्याचें ताट

x x x राव माझे भुकेले सोडा माझी वाट.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP