संग्रह २४१ ते २६०

लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.


२४१.

सौभाग्याचं लेणं, काळ्या मण्यांची पोत

x x x रावांच्या चरणीं अर्पण करते माझी जीवनज्योत.

२४२.

सासू सासरे भाग्याचे दीर माझे हौशी

x x x रावांचें नांव घेतें हळदी कुंकवाचे दिवशीं.

२४३.

मंगलदेवी मंगलमाते नमन करतें तुला

x x x रावांचं नांव घेतें अखंड सौभाग्य दे मला.

२४४.

आशिर्वाद लाखाचा, अहंकार फुकाचा

x x x रावांचा संसार करीन मी सुखाचा.

२४५.

सकाळच्या प्रहरीं नमन करतें दत्ताला

x x x रावांचं नांव घेतांना आनंद होतो चित्ताला.

२४६.

काशीसारखें शहर, प्रजेसारखा राजा

x x x रावांचं नांव घेतें केल्या पुण्यांत अर्धा हिस्सा माझा.

२४७.

रुक्मीणीनं पण केला कृष्णाला मी वरीन

x x x x x रावांचा संसार सुखाचा मी करीन.

२४८.

पांची पांडव सहावी द्रौपदी

x x x रावांसारखे मिळाले पति, तर देवाचे आभार मानूं किती.

२४९.

द्राक्षाच्या वेलाखाली चरत होत्या हरिणी

x x x रावांचं नांव घेतें वडिल मंडळींच्या चरणीं.

२५०.

जीवनरुपी सागरांत पतीपत्‍नींचा खेळ

x x x रावांचं नांव घेतें संध्याकाळची वेळ.

२५१.

मणी मंगळसूत्र हें माझें द्र्व्य

x x x रावांच्या आज्ञेंत रहाणें हेंच माझें कर्तव्य.

२५२.

देशांत देश हिंदुस्थान, जगामध्यें त्याचा मान

x x x रावांची कांता देशासाठीं करील दान.

२५३.

हत्तीवर अंबारी, उंटावर झारी

x x x रावांची आली स्वारी, तर पहातात नगरच्या नारी.

२५४.

संसाराच्या देव्हार्‍यांत नंदादीप समाधानाचा,

x x x रावांचा संसार करतें भाग्याचा.

२५५.

संसारुपी सागरांत पती-पत्‍नींची होडी, ईश्वरा सुखी ठेव

x x x रावांची नि माझी जोडी.

२५६.

यमुनेच्या तीरीं कृष्णदेव वाजवितो बांसरी,

x x x रावांच्या जिवावर मी आहें सुखी सासरीं.

२५७.

संसारामध्यें मुख्य असतात कनक आणि कांता,

x x x रावांना जन्म देणारी धन्य ती माता.

२५८.

चमकली शुक्राची चांदणी, चंद्र बुडाला ढगांत,

x x x राव पडले पदरांत तर सौभाग्यवती झालें जगांत.

२५९.

मानससरोवरांत रहातात राजहंस पक्षी,

x x x रावांचं नांव घेतें चंद्र सूर्य साक्षी.

२६०.

दोनशेचा शालू, त्याला तीनशेंचा पदर,

x x x रावांच्या नांवानं लेतें हळदी कुंकवाचा गजर.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP