३२१.
उत्तम ऋषी , गौतमऋषी, फुलं तोडते निशिगंधाची ,
न् भेट घेते x x x ची
३२२
सीतेला चालणं पडलं रामाच्या रथात ,सुखी राहीन
x x x मी रावांच्या संसारात.
३२३.
जिर साळीचा करते भात, येळ लवंगाची केली शाक, वनगाईचं पिवळं तूप,दारी
चंदनाचा पाट,चूळ भरावी नदीची , कृष्णाबाईचं तिरीथ, दारी दवबिन्याचं रोप,
चांदीच्या ताटाळ्यांत चिकनी सुपारी , कडुकांत जातें, बंदुला शेला पदर
पालवीतें, जा ग वहिनी उद्यां येते
x x x रावांच नांव तुमच्या देखत घेते.
३२४.
जरीचा पदूर अडकला तोड्यांत
x x x रावांच नांव घेते बाळातनीच्या वाड्यांत.
३२५.
चांदीच्या ताटांत केशरी बर्फी
x x x मालक निवडून आले आमच्या ग्रामपंचायती तर्फी.
३२६.
आपुल्या मुलुखांतच व्हायचा आपल्या भाषेचा मान
x x x रावांचा नांव घेते ऐका देऊन कान.
३२७.
उशाखालचा शेला पायाखाली गेला उठा उठा
x x x राव कासराभर दिवस आला.
३२८.
लावीत होतें कुंकू त्यांत पडलें मोती
x x x रावांसारखा भ्रतार जन्मोजन्मी चिंती.
३२९.
आधी घातला चंद्रहार मग घातली ठुशी
x x x रावांचं नांव घ्यायला नहेमींच माझी खुशी.
३३०.
एक पाय घरांत , एक पाय दारांत जडावाचं पदक
xx x रावांच्या हारांत.
३३१.
सागवानी पेटीला पोलादी चूक
x x x रावांच्या हातांत कायद्याचं बूक .
३३२.
शिसवी लाकडांचा देव्हारा त्यांत चांदीची मूर्ति,
x x x रावांची देशभक्त म्हणून जगभर कीर्ति .
३३३.
काळी चंद्र्कळा तिला मोतीचूर पदर
x x x रावांच्या जिवावर हळद कुंकवाचा गजर.
३३४.
चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा
x x x रावांच्या जिवावर मारतें मौजा.
३३५.
देवापुढं लावला ऊद, वास सुट्ला छान,
x x x रावांचं नांव घेते ऐका देऊन कान.