१०१.
तुळशीची करतें पूजा विष्णूची करतें शांति
x x x राव दीर्घायु व्हावेत अशी माझी विनंति.
१०२.
मथुरेच्या कुंजवनांत कृष्ण वाजवितो बासरी
x x x रावांच्या जिवावर सुखी आहे मी सासरीं.
१०३.
मंद वाहे वारा, चंद्र्भागेंत स्थिर चाले होडी
x x x रावांची व माझी सुखी आहे जोडी.
१०४.
जन्म दिला मातेनं, पालन केलें पित्यानं
x x x रावांचं नांव घेतें पत्नी या नात्यानं.
१०५.
हिंदमातेच्या हातांत रत्नजडावाचे तोडे
x x x रावांचं नांव घेतें वडील माणसांच्या पुढें.
१०६.
जाईजुईच्या झाडाखालीं फुलांचा विणला शेला
x x x रावांचं नांव घेतें दिवस अस्ताला गेला.
१०७.
लक्ष प्रदक्षणा घालतें उंबराला
x x x रावांचं नांव घेतें पहिल्या नंबराला.
१०८.
नऊ दिवस नवरात्र, दहाव्या दिवशीं दसरा
x x x रावांचं नांव घ्यायला नंबर माझा दुसरा.
१०९.
शंकराच्या पिंडीवर बेलाचें पान
x x x रावांचं नांव घेऊन राखतें तुमचा मान.
११०.
चांदीच्या ताटांत बर्फीची चवड
x x x रावांच्या नांवाची सर्वांना आवड.
१११.
संध्येच्या पळीवर नागाची खूण
x x x रावांचं नांव घेतें x x x सून.
११२.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी
x x x रावांचं नांव घेतें x x x दिवशीं.
११३.
रत्नजडीत सिंहासनावर उभा दत्तराज
x x x रावांचं नांव घेतें अखंड चुडा भरा आज.
११४.
प्राथमिक शाळेंत ज्ञानाची वाहते सरिता
x x x रावांचं नांव घेतें मैत्रिणींच्या आग्रहाकरितां.
११५.
रुणझुण जातें, खिडकीवाटे पाहतें, खिडकीला तीन तारा,
आडकित्त्याला घुंगरं बारा, पान खातें तेरा तेरा, घाम आला दरादरा
x x x राव बसले पलंगावर तर मी घालतें वारा.
११६.
रातराणीच्या सुगंधानं निशिगंध झाला मोहित
x x x रावांना आयुष्य मागतें सासुसासर्यासहित.
११७.
उभी होतें मळ्यांत, नजर गेली तळ्यांत, पांचशेंची कंठी
x x x रावांच्या गळ्यांत.
११८.
वेणीफणीच्या पेटीला बिलवरी आरसा
x x x रावांना घास घालतें अनारसा.
११९.
अनुसया, सीता, सावित्री होऊन गेल्या जगीं सती तीन
x x x रावांच्या चरणीं बाई मी असतें सदा लीन.
१२०.
गळ्यांत सरी वाकूं कशी, पायांत पैंजण चालूं कशी
x x x राव बसले मित्रापाशीं तर मोठयानं मी बोलूं कशी ?