संग्रह १८१ ते २००

लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.


१८१.

नीलवर्ण आकाशांत चमकतो शुक्राचा तारा

x x x रावांच्या सहवासांत मला लागतो सुखाचा वारा.

१८२.

काशीच्या तांब्याला रामेश्‍वराची खूण

x x x नांव घेतें x x x सून.

१८३.

गोट केले, पाटल्या केल्या, मध्यें लेतें केरवा

x x x रावांच्या जीवावर शालू नेसतें हिरवा.

१८४.

चंदनाच्या पाटाला रुप्याचे ठसे

x x x राव पाटावर बसे तर चंद्रसूर्य हंसे.

१८५.

गुलाबाचं फूल माळ्याच्या मळ्यांत

x x x रावांचं नांव घेतें सवाष्णींच्या मेळ्यांत.

१८६.

अंजिरी चोळीला मिर्‍यायेवढी गाठ

x x x रावांचं नांव घेतें हळदी कुंकवाचा थाट.

१८७.

काळी निळी घोडी मुंबईच्या बाजारीं

x x x रावांची खुर्ची वकिलाशेजारी.

१८८.

चांदीच्या ताटांत खडी साखरेचे काजू

x x x राव निघाले कचेरीला फौजदार देती बाजू.

१८९.

पैठणी नको, शालू नको, नको भरजरी शेला

x x x रावांच्या ह्रुदयांत जागा आहे मला.

१९०.

सहस्त्र कमळामध्यें वास आहे लक्ष्मीचा, मला आहे अभिमान

x x x रावांच्या नांवाचा.

२००.

अहमदाबादी चंद्रकळा, तिला मोत्यांचा पदर

x x x रावांच्या जिवावर हळदीकुंकवाचा गजर.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP