१२१.
पिकलेल्या पानांत बदाम घातले किसून
x x x रावांना विडा देतें पलंगावर बसून .
१२२.
चहा केला, चिवडा केला, कॉफी केली ताजी
x x x रावांचं नांव घेतें सर्वांची होती म्हणून मर्जी.
१२३.
मोठमोठया आकाराचे मोतीं वेचून काढले बारा
x x x रावांचे नांव घेतें माझं नांव तारा.
१२४.
सोन्याची बुगडी, मोत्यांचा कळस
x x x रावांचं नांव घेण्याला मला नाहीं आळस.
१२५.
आले राम सीता न् लक्ष्मण दीर,
x x x रावांचं नांव घेतें मंडळींनो व्हा स्थीर.
१२६.
काळ्या गाईचें लोणी, कड कड कढविलें,
x x x रावांचे महालांत कारंजें उडविलें.
१२७.
हापूस आंबा पायरी, त्याच्या केल्या फोडी,
x x x रावांच्या आंगठीवर राधाकृष्णाची जोडी.
१२८.
दारीं होती तुळस, तिला घालते पळी पळी पाणी, पहिली होती आईबापांची
तान्ही आतां झालें x x x रावांची राणी.
१२९.
मी होतें मळ्यांत, चंद्र दिसतो तळ्यांत
x x x रावांच्या नांवानें मंगळसूत्र बांधतें गळ्यांत.
१३०.
समुद्रात आली भरती, नदीला आला पूर
x x x रावांच्यासाठीं आईबाप केले दूर.
१३१.
गणपतीच्या डोक्यावर ठेवलें हिरेमाणकांचें छत्र
x x x रावांच्या नांवानें बांधतें मंगळसूत्र.
१३२.
सोळा वर्षांपर्यंत होतें माहेरच्या मायेंत
x x x रावंच्यासाठीं जाईन सासरच्या छायेंत.
१३३.
विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व
x x x रावांचं नांव घेतें ऐकत आहेत सर्व.
१३४.
द्वारकेचा राजा, पाठीराखा द्रोपदीचा
x x x रावांना मी घांस देतें साखरभाताचा.
१३५.
आप्तांची भेट प्रेमाला येते भरती
x x x रावांची जोड हीच जीवनाची पूर्ती.
१३६.
स्वराज्याच्या बागेमध्यें गांधी झाले माळी
x x x रावांचं नांव घेतें वरातीचे वेळीं.
१३७.
वसंत ऋतूंमध्यें जशी येते कोकीळेची चाहूल तशीच मी टाकीतें
x x x रावांच्या घरामध्यें पाऊल.
१३८.
जिजाईनीं केला शिवादेवीला नवस,
आज x x x चा आला भाग्याचा दिवस.
१३९.
नमस्कार फुकाचा, आशिर्वाद मोलाचा
x x x रावांचा संसार करीन मी सुखाचा.
१४०.
श्रीकृष्णाची राधा, शंकराची पार्वती
x x x च्या जोडीला आशीर्वाद देती.