क्षण एक तरी तू येशिल का ?
चरणाच्या स्पर्शे तव मंगल
पावन घर मम करशिल का ?
मिरवणूक ये वाजत गाजत
नृपापरी तू तीत विराजत
दुमदुमती जयनाद तुझे नित
वैभव ते विसरून घडीभर
स्वागत हे मम घेशिल का ?
जीवनसुम तुजसाठी उमले
फुलले, मोहरले, परिमळले
भावपराग उरी थरथरले
लवूनिया लतिकेवर खाली
भक्तिभाव हा बघशिल का ?
अथांग महती जाणत अन्तर
अलंकारले श्रमून मंदिर
अवघे भवती निर्मळ सुन्दर
जाणुनिया मम अथांग प्रीती
ह्रदयाशी मज धरशिल का ?
क्षण एक तरी तू येशिल का ?