आणि आज मन शंकित हे होई
आहेस की नाही मुळात तू
भित्या भावनेला शोधायासी धीर
पाषाणास थोर मीच केले
दुर्बलता माझी दडवाया गेलो
अधिक जाहलो दुर्बल मी
टाकूनिया शस्त्र सोडूनिया रण
वाचवाया प्राण येथे आलो
भीरुतेत माझ्या तुझे संगोपन
मीच केले मन रंजवाया
परततो आता रणात माघारा
शूरांना निवारा समरात
माझ्या जीवनाचा मीच शिलेदार
व्यर्थ हा पुकार तुझ्या दारी
आहेस की नाही आज नसे चिंता
दोहीमहे आता भेद नुरे !