धर्मशास्त्रीय संकेत
भारतीय ज्योतिष शास्त्राने सूर्य - केतू अशा नऊ ग्रहांना मान्यता दिलेली आहे, शिवाय मेष - मीन या राशी या ग्रहांशी संबंधित आहेत.
हे नवग्रह त्या त्या राशीत असलेल्या आपल्या स्थानाप्रमाणे शुभाशुभ फळे देतात.
सूर्य आणि चंद्र यांचि प्रत्येकी एक राशी असून, बाकी ग्रहांच्या दोन-दोन राशी आहेत.
व्यक्तीच्या जन्मासमयि जी राशी पूर्वेला उगवत असते, तीच त्याची जन्मराशी समजली जाते. आणि त्या राशीच्या नक्षत्रावरून त्या व्यक्तीचे नामकरण केले जाते.
जन्मराशीचा प्रभाव त्या राशीच्या व्यक्तींवर जीवनभर पडतो. त्याचे कारण असे की प्रत्येक राशीचा स्वामी एक ग्रह असतो, आणि त्या ग्रहासंबंधी देवता असते.
म्हणून त्या व्यक्तिने त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश्वर्य आणि शांती प्राप्त होते.