गुरु बृहस्पति पूजन
गुरु (बृहस्पति) नीतिमान आहे. जन्मकुंडलीत गुरु शुभ स्थानात असेल तर जातक ज्ञानी, लोकप्रिय आणी यशस्वी होतो. परंतु जर अशुभ स्थानात असेल तर जातक मंद बुद्धि आणि आकर्षणहीन असतो. सूर्य मालिकेत गुरुचे स्थान सूर्याच्या उत्तरेला आहे. गुरुची पुजा शुक्लपक्षात येणार्या पहिल्या गुरुवारी संध्याकाळी करतात. गुरुची आराधना ज्या मुलींच्या विवाहात विलंब होत असेल त्यांना विशेष फलदायी असते. गुरुवारी उपास करणार्याने केळीच्या झाडाची पिवळे वस्त्र धारण करून पूजा करावी, आणि दिवसातून एकदा पिवळ्या रंगाचे भोजन करावे.
आवाहन मंत्र
हातात पिवळ्या रंगाचे फूल आणि तांदूळ घेऊन खालील मंत्र म्हणावा.
ॐ बृहस्पते अति यदर्यो अहार्दधुमद्विभाति क्रतुमज्जनेषु ।
यदीदयच्छवसऋतप्रजात तदस्मासु द्रविणं धेहि चित्रम् ॥
उपायाम गृहीतोअसि बृहस्पतये त्वैष ते योनिर्बृहस्पतये त्वा ॥
देवानां च ऋषीणां च गुरुं कांचनसन्निभम् ।
वन्द्यभूतं त्रिलोकानां गुरुमावाहयाम्यहम् ॥
स्थापना मंत्र
नंतर खालील मंत्र म्हणून गुरुची स्थापना करावी.
ॐ भूर्भुवः स्वः बृहस्पते इहागच्छ इहतिष्ठ ।
ॐ बृहस्पते नमः ॥
मंत्र म्हणून झाल्यावर पिवळे फूल आणी पिवळ्या रंगाचे तांदूळ नवग्रह मंडळात गुरुच्या स्थानावर सोडावे.
ध्यान मंत्र
खालील मंत्र म्हणून गुरुचे ध्यान करावे.
पीताम्बरः पीतवपुः किरीटी चतुर्भुजो देवगुरुः प्रशान्तः ।
पद्माक्षसूत्रं च कमण्डलुं च दंड च विभ्रद्वंरदो अस्तु ॥
गुरु मंत्र
गुरुच्या मंत्राची जपसंख्या १९००० आहे.
ॐ बृं बृहस्पते नमः ।
ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः ।
गुरु यंत्र
यंत्राच्या अकांची बेरीज कुठुनही केली तरी २७ इतकीच येते. गुरु यंत्र कोणत्याही महिन्यात शुक्लपक्षात येणार्या पहिल्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग असताना डाळिंबाची काडी केशराच्या शाईत बुडवून भुर्जपत्रावर लिहावे. नंतर त्या यंत्राची धूप, दीप सुगंधित पिवळी फुले वाहून
ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः ।
हा मंत्र म्हणून सोन्याच्या ताईतामध्ये किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये धारण करावे.