केतु पूजन
केतु या ग्रहाला सुद्धा छाया ग्रह मानतात. जन्मकुंडली मध्ये केतु जर शुभ स्थानावर असेल तर जातक भयानक दुर्घटनेपासून सुद्धा सुरक्षित राहतो. परंतु तो अनिष्ट असेल तर जातकाला चर्मरोग, तुरुंग, पाण्यापासून अपघात होण्याचा संभव असतो. सूर्य मालिकेत केतुचे स्थान नैऋत्य दिशेला असते. केतुच्या वक्री असण्याने जातक वाईट शक्तींपासून मुक्त होतो. केतुची पूजा मंगळवारी रात्रीच्या पहिल्या प्रहरात करतात. रविपुष्य योगाच्या प्रारंभी अथवा कन्या किंवा मकर लग्न असता केतुची पूजा अधिक फलदायी होते.
आवाहन मंत्र
काळी फुले आणि काळ्या अक्षता हातात घेऊन खालील मंत्र म्हणून केतुला आवाहन करावे.
पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रहमस्तकम् ।
रौद्रं रौद्रात्मकं घोरं केतुं आवाहयाम्यहम् ॥
स्थापना मंत्र
त्यानंतर खालील मंत्र म्हणून केतुची स्थापना करावी.
ॐ भूर्भुवः स्वः केतो इहागच्छ इहतिष्ठ ।
ॐ केतवे नमः ।
हा मंत्र म्हणल्यावर काळ्या अक्षता आणि काळी फुले घेऊन ती नवग्रह मंडळात असलेल्या केतुच्या स्थानावर सोडून द्यावी.
ध्यान मंत्र
त्यानंतर खालील मंत्र म्हणून केतुचे ध्यान करावे.
धूम्रो द्विबाहुर्वरदो गदाधरो गृद्धासनस्थो विकृताननश्च ।
किरीट केयूर विभूषितो यः सर्वोस्तु मे केतुगणः प्रशान्त्येऐ ॥
ॐ अनेक रूपवर्णश्च शतशोऽथ सहस्त्रशः ।
उत्पातरूपो जगतां पीडां हरतु ते शिखी ॥
केतु मंत्र
खाली केतुचा बीज मंत्र दिलेला आहे. त्याच्या मंत्रजपाची संख्या १७००० इतकी असते.
ॐ कें केतवे नमः ।
ॐ स्त्रां स्त्रीं स्त्रौं सः केतवे नमः ।
केतु यंत्र
यंत्राच्या अकांची बेरीज कुठुनही केली तरी ३९ इतकीच येते. हे यंत्र कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षात येणार्या पहिल्या रविवारी किंवा मंगळवारी शुभ नक्षत्र असताना डाळिंबाची काडी काळ्या शाईत बुडवून पांढर्या शुभ्र कागदावर लिहावे. नंतर त्या यंत्राला धूप, दीप आणि काळी फुले वाहून
ॐ स्त्रां स्त्रीं स्त्रौं सः केतवे नमः ।
हा मंत्र म्हणून लोखंडाच्या ताईतामध्ये किंवा काळ्या किंवा निळ्या वस्त्रामध्ये ठेवून श्रद्धा आणि विश्वासपूर्वक धारण करावे.
१४ |
९ |
१६ |
१५ |
१३ |
११ |
१० |
१७ |
१२ |